दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

गोवा येथे 28.09.2020 रोजी सकाळी 11:00 वाजता 45 व्या प्रादेशिक स्तरीय डाक अदालतीचे आयोजन

Posted On: 11 SEP 2020 2:55PM by PIB Mumbai

 

देशाच्या सामाजिक आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेली टपाल सेवा प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याशी थेट निगडित आहे. आपल्या ग्राहकांचे पूर्ण समाधान करणारी सेवा देण्यासाठी टपाल विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील असतो, मात्र कधीकधी दळणवळणातील अडथळे आणि सेवेतील त्रुटी यामुळे गाऱ्हाणी आणि तक्रारींमध्ये वाढ होते. अशा गाऱ्हाणी / तक्रारींचे प्रभावी पद्धतीने निवारण करण्यासाठी विभाग वेळोवेळी अदालतींचे आयोजन करतो ज्यात विभागातील कर्मचारी नाराज ग्राहकांना भेटतात, त्यांच्या तक्रारींबद्दल तपशील गोळा करतात आणि लवकरात लवकर तो सोडवण्याचा प्रयत्न करतात.

पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, पणजी 403001 यांनी 28.09.2020 रोजी सकाळी 11:00 वाजता 45 व्या प्रादेशिक स्तरीय डाक अदालतीचे आयोजन पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, पणजी 403001 यांच्या कार्यालयात केले आहे.

गोवा विभागाशी संबंधित टपाल सेवांविषयी 6 आठवड्यांत निकाली न काढलेली गाऱ्हाणी / तक्रारी यांचा निपटारा या डाक अदालतीमध्ये केला जाईल. मेल, स्पीड पोस्ट, काउंटर सर्व्हिसेस, सेव्हिंग्ज बँक आणि मनी ऑर्डर न भरण्याबाबतच्या तक्रारीं यावेळी विचारात घेतल्या जातील. उपस्थित केलेल्या तक्रारीत तारीख, नावे आणि ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार केली होती त्यांचे पदनाम यासारख्या बाबींचा तपशील असावा. इच्छुक ग्राहक टपाल सेवांबाबत त्यांच्या तक्रारींची दुसरी प्रत के.बालाराजू, सचिव, डाक अदालत व सहाय्यक संचालक पोस्टल सर्व्हिसेस, पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, पणजी 403001 यांच्या कार्यालयात पाठवू शकतात. तक्रार दाखल करण्याची अंतिम तारीख 18.09.2020 आहे.

 

M.Chopade/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653486) Visitor Counter : 75


Read this release in: English