श्रम आणि रोजगार मंत्रालय
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या हस्ते चंदिगढ इथल्या “श्रम ब्युरो भवन” चे उद्घाटन
Posted On:
11 SEP 2020 9:22PM by PIB Mumbai
केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष कुमार गंगवार यांच्या हस्ते आज चंदिगढ इथल्या श्रम विभागाची नवी इमारत- ‘श्रम ब्युरो भवन’ चे उद्घाटन झाले. आज श्रम विभागाचा शताब्दी महोत्सव आहे.
गेली अनेक वर्षे, चंदिगढच्या श्रम विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे यावेळी गंगवार यांनी कौतुक केले, त्यांच्या एकत्रित प्रयत्नातूंच, हे “श्रम ब्यूरो भवन” उभारण्यात यश आले आहे, असे गंगवार यावेळी म्हणाले.
श्रम आणि कामगारांशी सबंधित सर्व आकडेवारी आणि माहितीचे संकलन अद्ययावत आणि अचूक असेल,तर त्यातून धोरणनिर्मिती करतांना योग्य दिशा आणि स्पष्टता मिळते. त्यामुळेच, श्रमक्षेत्राशी सबंधित सांख्यिकीचे संकलन आणि विश्लेषण करणाऱ्या श्रम विभागासारख्या संस्थांचे विशेष महत्व आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. डेटा या संकल्पनेला आगामी काळातही अनन्यसाधारण महत्व असेल, त्याशिवाय भारतासारख्या विपुल कामगारशक्ती असलेल्या देशात, कामगार विभागासारख्या कामगार सांख्यिकीशी समर्पित संस्थांचे काम अधिकच महत्वपूर्ण ठरते असेही गंगवार यावेळी म्हणाले.
M.Chopade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653466)
Visitor Counter : 105