अल्पसंख्यांक मंत्रालय
अल्पसंख्यक विकास मंत्रालयाकडून अल्पसंख्य समुदायाच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
ज्या शिक्षणसंस्थांमध्ये अल्पसंख्यक विद्यार्थी आहेत, त्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत नावनोंदणी करावी
Posted On:
10 SEP 2020 7:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 10 सप्टेंबर 2020
केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्रालायाने, जैन, बौद्ध, शीख, पारसी, मुस्लिम आणि ख्रिश्चन या सहा अधिसूचित अल्पसंख्याक समुदायातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांसाठी 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी उपलब्ध केली आहे. या अंतर्गत तीन शिष्यवृत्ती योजना आहेत:- मैट्रिकपूर्व, मैट्रिकोत्तर आणि मेरीट कम योजना.
या योजनेसाठीचे पात्रता निकष पुढीलप्रमाणे :
- आवेदनकर्ता विद्यार्थी अधिसूचित अल्पसंख्यक समुदायाचा असायला हवा.
- आवेदनकर्ता भारतात कोणत्याही सरकारी शिक्षणसंस्थेत अथवा सरकारमान्य खाजगी शाळा/संस्था/महाविद्यालय/शाळेत शिक्षण घेत असावा.
- त्याच्या अभ्यासक्रमाचा शैक्षणिक कालावधी किमान एक वर्ष तरी असावा.
- आधीच्या वार्षिक बोर्ड किंवा शालेय परीक्षेत त्याने किमान 50 टक्के गुण मिळवलेले असावेत.
ही संधी मिळवण्यासाठी अर्जदाराने कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या www.scholarships.gov.in. या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. या वेबसाईट ची लिंक केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या (www.minorityaffairs.gov.in) या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
नव्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख तसेच जुनी शिष्यवृत्ती या दोन्हीसाठीची तारीख 31 ऑक्टोबर 2020 करण्यात आली आहे.
ऑनलाईन आर्ज भरण्यासह वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आणि माहिती, राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जदारांनी त्यांच्या चालू बँक खात्याचीच माहिती द्यावी अशी सूचना देण्यात आली आहे जेणेकरुन, या शिष्यवृत्तीसाठी भरलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल.
सर्व विद्यापीठे, संस्था, महाविद्यालये आणि शाळा- जिथे जिथे अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्या सर्व शिक्षणसंस्थांनी (आधी नोंदणी केली नसल्यास) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर 30 सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
जर उमेदवाराला या योजनेविषयी काही शंका असतील तर त्यांनी समाधान या टोल फ्री मदतक्रमांक 1800-11-2001 वर सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये (सरकारी सुट्ट्या वगळता) सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत संपर्क साधावा.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653079)