संरक्षण मंत्रालय
कारागीर संयुक्त प्रशिक्षणार्थी अभ्यासक्रम-30 पूर्ण
Posted On:
28 AUG 2020 6:16PM by PIB Mumbai
पुणे , 28 ऑगस्ट 2020
संयुक्त कर्मचारी प्रशिक्षणार्थी अभ्यासक्रम, 30 अंतर्गत 192 प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. यात भारतीय नौदलाचे 142, तटरक्षक दलाचे 42 आणि आठ परदेशी प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. परदेशी प्रशिक्षणार्थीमध्ये चार श्रीलंकेतील तर प्रत्येकी एक घाना, टांझानिया, फिजी आणि मालदीव देशातील प्रशिक्षणार्थी होते. 117 आठवड्यांचे हे प्रशिक्षण भारतीय नौदलाची पहिली सागरी अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था, आयएनएस शिवाजी येथे देण्यात येते. आज म्हणजेच 28 ऑगस्ट 2020 रोजी हा अभ्यासक्रम पूर्ण झाला. या दीक्षांत सोहळ्याला आयएनएस शिवाजीचे प्रमुख अधिकारी, कमोडोर रवींश सेठ,उपस्थित होते.
5JWS.jpeg)
या अभ्यासक्रमात, भारतीय नौदलाच्या तुकडीच्या सर्वांगीण कामगिरीत अंकित कुमार हे प्रशिक्षणार्थी अव्वल ठरले, त्यांना 89.86% गुण मिळाले. तर सूरज साठे, तटरक्षक दलाचे प्रशिक्षणार्थी, यांनी पदविका अभ्यासक्रमात 82.13% गुण मिळवत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. निखील कटोच या प्रशिक्षणार्थीला सर्वोकृष्ट खेळाडूचा फिरता चषक प्रदान करण्यात आला.
GPTS.jpeg)

1T1A.jpeg)

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649292)
Visitor Counter : 204