माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘एक भारत श्रेष्ठ भारत अभियानांतर्गत जोडराज्य गोवा-झारखंड’ वर वेबिनारचे आयोजन
Posted On:
26 AUG 2020 9:00PM by PIB Mumbai
मुंबई, 26 ऑगस्ट 2020
पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि गोवा आणि रिजनल आऊटरीच ब्युरो, महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत मोहिमेअंतर्गत जोडराज्य असलेल्या गोवा-झारखंड’ विषयी वेबिनारचे आज आयोजन करण्यात आले होते.
वेबिनारचा प्रारंभ पत्र सूचना कार्यालय आणि रिजनल आऊटरीच ब्युरो, रांचीचे अतिरिक्त महासंचालक अरिमर्दन सिंह यांनी केला. ते म्हणाले, गोवा आणि झारखंड ही दोन्ही राज्ये सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न आहेत. एकीकडे गोवा वैश्विक संस्कृती आणि समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर, झारखंड आदिवासी संस्कृती, कोळसा, खनिजसंपत्ती आणि हरितपट्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. दोन्ही राज्यांतील आहारपद्धती, वेशभूषा, राहणीमान भिन्न असले तरी दोन्ही राज्य एकमेकांशी जोडली आहेत.
गोव्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार तसेच लेखक विवेक मेनेझिस याप्रसंगी म्हणाले की, गोव्यावर आणि झारखंडवरही अनेक वर्षे पोर्तुगीजांचे शासन होते. पोर्तुगीज शासनकाळात गोवा व्यापाराचे प्रमुख जागतिक केंद्र होते. याठिकाणाहून मोझंबिक, फिलीपाईन्स, मकाऊ आणि उत्तर अमेरिकेपर्यंत व्यापार होता. गोव्यावर कोंकण संस्कृतीचा प्रभाव आहे, ज्यात अधिक मोकळेपणा आहे. भारतात बटाटे, मका गोव्यातूनच पोहचली आहेत, जे आपल्याकडील पीक नव्हते. जेंव्हा आपण भारताविषयी बोलतो, तेंव्हा त्यात झारखंड किंवा गोव्याच्या संस्कृतीचा उल्लेख नसतो. आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल, जेंव्हा आपण भारताविषयी बोलतो तेंव्ही ती चर्चा समावेशी असली पाहिजे. गोव्यात राहणाऱ्या आदिवासी समुदायाबद्दल बोलताना ते म्हणाले, गोवा एक आंतरराष्ट्रीय शहर असल्यासारखे होते. मात्र, लोकसंगीत आणि स्थानिक राहणीमान गोव्याची ओळख बनली आहे.
वेबिनारमध्ये झारखंड येथील प्रसिद्थ लेखक आणि आदिवासी संस्कृती तज्ज्ञ महादेव टोप्पो यांनी झारखंडची समृद्ध परंपरा आणि संस्कृतीची माहिती दिली. ते म्हणाले, झारखंड केवळ नैसर्गिक सौंदर्य आणि आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध नाही तर सर्वोच्च प्रतिचे लोह आणि कोळसा आढळतो. त्यांनी निसर्गाशी संबंधित विविध सणांची तपशीलवार माहिती दिली. त्यांनी आदिवासी समुदायातील नृत्य आणि निसर्गाशी संबंधित जीवनासंबंधीचे शिक्षण आणि सामाजिक शिक्षण पद्धतीची माहिती दिली.
आदिवासी संस्कृती विश्लेषक गिरधारी राम गोंझू यांनी याप्रसंगी आदिवासी संस्कृतीची माहिती दिली.
झारखंडमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी कोहिमामध्ये ज्यापद्धतीने हॉर्न बिल फेस्टिवल आहे, तसाच एखादा फेस्टिवल सुरु करता येईल. तसेच सरहुल, कर्मा या सण-समारंभामध्ये अमेरिका, इराण, युरोपातील लोकांना सहभागी करुन घेतल्यास पर्यटनाला लाभ होईल. पाईका आणि छऊ नृत्य हेही पर्यटनाचे महत्त्वपूर्ण आकर्षण आहे, यावर व्यापक चर्चा करण्यात आली.
वेबिनारचे सम्वयन पत्र सूचना कार्यालय, पणजीचे उपसंचालक विनोद कुमार यांनी तर संचलन पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या श्रीयंका चटर्जी यांनी केले.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648843)
Visitor Counter : 184