सांस्कृतिक मंत्रालय

नेहरू विज्ञान केंद्र लॉकडाऊन व्याख्यानमालेत नोबेल पारितोषिक आणि भारतीय नागरी सेवा परीक्षे दरम्यानच्या काही अपरिचित तथ्यांचा उलगडा


आयसीएस मध्ये अव्वल स्थान पटकावलेल्या मॅरिसने, दुसरा क्रमांक पटकावलेल्या अर्नेस्ट रुदरफोर्डला त्याच्या नोबेल प्रवासात कशी मदत केली

महात्मा गांधींची तुलना फक्त धर्म संस्थापकांशी केली जाऊ शकते: 1948 नोबेल समिती

Posted On: 17 AUG 2020 6:19PM by PIB Mumbai

मुंबई, 17 ऑगस्‍ट 2020
 

असे म्हणतात की ‘महान व्यक्ती एकसारखे विचार करतात’! आपण या पारंपारिक म्हणी मध्ये थोडा बदल करून असे म्हणू की, ‘महान व्यक्ती एकाच शाळेत शिकतात’, 19व्या शतकातील दोन महान व्यक्तिमत्व जी संबंधित क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचली आहेत ते दोघेही वर्गमित्र होते. त्यातील एकाला आपण “आण्विक भौतिकशास्त्राचे प्रणेते’ – सर अर्नेस्ट रुदरफोर्ड म्हणून ओळखतो. तर दुसरे आहेत, आयसीएस अधिकारी विल्यम सिन्क्लेयर मॅरिस, ज्यांनी 1895 मध्ये आयसीएस परीक्षेत अव्वल स्थान पटकावून ब्रिटीश राजवटीदरम्यान संयुक्त प्रांतातील सहाय्यक दंडाधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती; आणि त्यानंतर ते भारतीय कौन्सिलचे सदस्य आणि दुरहम विद्यापीठाचे कुलगुरूही झाले. या दोन्ही महान व्यक्ती 1890-93 या वर्षात न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च येथील कॅन्टरबरी महाविद्यालयात मित्र होते.त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीशी संबंधित घटनांनी भविष्यातील विज्ञान आणि भारतीय नागरी प्रशासन यांचे भवितव्य ठरविले.

ज्येष्ठ वैज्ञानिक, माजी संचालक, केमिकल ग्रुप, बीएआरसी, मुंबई आणि आयआयटी बॉम्बे, च्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक, प्रा.बी.एन. जगताप, यांनी नेहरू विज्ञान केंद्राच्या लॉकडाउन व्याख्यानमालेत ही एक छोटी गोष्ट सांगितली.‘वर्ष 1908चे रसायन शास्त्रातील नोबेल पारितोषिक आणि 1885 च्या भारतीय नागरी सेवा परीक्षेचा संबंध’ ‘The Nobel Prize in Chemistry 1908 & it’s connect with the Indian Civil Service Exam of 1885’) या व्याख्यान मालेत प्रा. जगताप यांनी कथाकथन शैलीत “साडे तीन पात्र” (‘three and half characters’) यांची ओळख करून दिली.त्यापैकी दोन आहेत, सर रुदरफोर्ड आणि विल्यम एस. मॅरिस, तर स्वतंत्र-पूर्व भारतातील आणखी एका सुप्रसिद्ध ब्रिटीश प्रशासक ज्यांचा या कथेशी संबंध आहे ते आहेत - जॉर्ज कारमीकल, ज्यांनी 1886 मध्ये आयसीएस परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता. प्राध्यापकांनी त्यांच्या कथेत उल्लेख केलेले ‘अर्धे पात्र - परंतु सर्वात महत्वाचे’ म्हणजे वॉल्टर एम्पसन जे मॅरिस विद्यार्थी असताना न्यूझीलंडमधील वांगानुई महाविद्यालयीन शाळेत प्राचार्य होते.वर्ष 1886 मध्ये, जेव्हा एम्पसनचा चुलत भाऊ कार्मिकल आयसीएसमध्ये प्रथम आला, तेव्हा त्याने विद्यार्थी दशेतील 13 वर्षीय मॅरिस जो 'विली' म्हणून म्हणून प्रसिद्ध होता त्याला “तू भारतीय प्रशासकीय सेवत जा” (“यू गो फॉर द इंडियन सिव्हिल”)असा सल्ला दिला.अखेरीस, प्रिन्सिपल एम्पसनने आपला आवडता विद्यार्थी विलीच्या अभ्यासाची योजना आखली.त्यानंतर, 1893 मध्ये, जेव्हा मॅरिस कॅन्टरबरी महविद्यालयात प्रथम आला, तेव्हा त्याचा वर्गमित्र रुदरफोर्डचा दुसरा क्रमांक आला होता.मॅरिस, प्रथम आला म्हणून त्याला,इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात जे.जे. थॉम्पसन यांच्या हाताखाली संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली.अखेरीस, 1895 मध्ये आयसीएस परीक्षेत अव्वल स्थान मिळविल्यानंतर, मॅरिसने प्रतिष्ठित शिष्यवृत्तीवरील आपला दावा सोडला आणि म्हणून ती दुसरा क्रमांक प्राप्त केलेल्या रुदरफोर्डला मिळाली.“कालांतराने, मॅरिस हा एक अत्यंत यशस्वी नागरी सेवा अधिकारी बनला, तर रदरफोर्डने भौतिक जगतामध्ये मोठे योगदान दिले आणि आज आपल्याला अणू आणि त्यांचे कार्य याबद्दल असलेली माहित ही त्याचेच योगदान आहे ज्याने मोठ्या संख्येने शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन केले. म्हणजे, 1895 च्या आयसीएस परीक्षेत मॅरिसने जर अव्वल स्थान प्राप्त केले नसते तर सर जे. जे. थॉम्पसन यांच्या नेतृत्वात रुदरफोर्डने संशोधन केले नसते, ज्याच्या आधारे त्यांनी पुढे संशोधन केले आणि 1908 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकले!दुसरा क्रमांक पटकावलेल्या रुदरफोर्ड यांची गणना आतापर्यंतचा सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणून केली जाते आणि सर आयझॅक न्यूटन सारख्या ब्रिटिश महान शास्त्रज्ञाच्या बाजूला वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे त्यांना सन्मानपूर्वक दफन करण्यात आले.

या महान व्यक्तींमधील हा थोडासा ज्ञात संबंध सांगताना प्रा. जगताप यांनी तरुणांना त्यांच्या स्वप्नांचा व त्यांच्या आवडीच्या क्षेत्राचा पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला.या कथाकथन सत्रात, प्राध्यापकांनी भारतीय नागरी सेवा परीक्षा आणि प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांच्या इतिहासावरही प्रकाश टाकला.या संस्थांशी संबंधित काही थोड्या ज्ञात आणि रोचक गोष्टीं त्यांनी अधोरेखित केल्या. असेच एक फार कमी लोकांना माहित असलेले तथ्ये म्हणजे इतिहासात काही वेळा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला नव्हता प्रामुख्याने युद्धकाळात.परंतु 1948 मध्येही शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही.त्यावर्षी महात्मा गांधी यांच्यासाठी नामांकन होते.परंतु नामांकन प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आधीच गांधींची हत्या करण्यात आली होती.हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाऊ शकतो की नाही यावर नोबेल समितीने चर्चा केली होती. मरणोत्तर पुरस्कार देण्याच्या काही अटी आहेत.पुरस्कार जाहीर केल्यानंतर पुरस्कार प्राप्तकर्त्याचा मृत्यू झाल्यासच त्याला मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित केले जाऊ शकते.त्यावर्षी समितीने नोबेल शांतता पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला.या संदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले ज्यात असे नमूद करण्यात आले की, “यावर्षी पुरस्कारासाठी योग्य उमेदवार नाही” आणि त्यातील एक टिप्पणी अशी होती की, “या संदर्भात गांधींची तुलना फक्त धर्म संस्थापकांशी केली जाऊ शकते”.

भारतीय नागरी सेवेच्या उत्क्रांतीबद्दल बोलताना प्रा. जगताप यांनी सांगितले की, हे सर्व 1757 मधील प्लासीच्या युद्धापासून सुरू झाले.रविंद्रनाथ टागोर यांचे थोरले बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे 1863 मध्ये आयसीएस परीक्षेत पात्र ठरलेले पहिले भारतीय होते.1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशात 322भारतीय आयसीएस अधिकारी आणि  688 ब्रिटीश आयसीएस अधिकारी होते.

 

* * *

M.Iyengar/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646481) Visitor Counter : 163


Read this release in: English