संरक्षण मंत्रालय
आयएनएस शिवाजी येथे स्वातंत्र्यदिनसोहळ्याचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2020 10:00PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाचे लोणावळा येथील प्रमुख तांत्रिक प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजीवर 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कमांडिंग अधिकारी आणि आयएनएस शिवाजीचे स्टेशन कमांडर कमोडोर रवनीश सेठ यांनी राष्ट्राच्या संरक्षणार्थ सर्वोच्च बलिदान दिलेल्या सागरी योद्ध्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.


सर्व जवान आणि संरक्षण कर्मचाऱ्यांचे नौदल प्रमुखांनी कौतुक केले आणि दक्षिणी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफीसर कमांडिग इन चीफ यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. जवान आणि संरक्षण कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषक देऊन गौरवण्यात आले. कमांडिग ऑफिसर यांनी उपस्थित जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सोहळ्यादरम्यान कोविड-19 संबंधीची पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती.

***
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1646200)
आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English