संरक्षण मंत्रालय
एएफके पुणे ने केले 40एमएम यूबीजीएल (अंडर बॅरेल ग्रेनेड लाँन्चर) दारुगोळ्याचे उत्पादन
प्रविष्टि तिथि:
12 AUG 2020 10:33PM by PIB Mumbai
पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या नाऱ्याने प्रेरित होऊन पुण्याच्या खडकी येथील दारूगोळा कारखान्याने (अम्युनिशन फॅक्टरी) 40एमएम यूबीजीएल(अंडर बॅरेल ग्रेनेड लाँन्चर) दारुगोळ्याचे उत्पादन करून स्वयंपूर्णता आणि स्वदेशीकरणात एक नवीन अध्याय लिहिला आहे. 11 ऑगस्ट 2020 रोजी सीमा सुरक्षा दलाला या कारखान्यातून या दारुगोळ्याचा पहिला साठा पाठवण्यात आला.

5.56 एमएम रायफल (आयएनएसएएस) च्या बॅरेलखाली बसवण्यात आलेल्या लाँचरमधून याची चाचणी घेण्यात आली.
पारंपारिक हँड ग्रेनेड आणि 40 एमएम युबीजीएल दारूगोळ्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेतः
1) हे कमी वजनाचे आहे
2) हँड ग्रेनेडच्या 30 मीटरच्या तुलनेत याचा पल्ला 400 मीटर आहे.
3) जवानांकडून एकाच उपकरणाद्वारे तो वापरता येऊ शकतो
4) जवानांना बरोबर नेण्यासाठी हा अतिशय सुरक्षित दारुगोळा आहे
दारुगोळ्याचे चार प्रकार आहेत: -
1) 40 एमएम यूबीजीएल (प्रॅक्टिस )
2) 40 एमएम यूबीजीएल (एचईएपी )
3) 40 एमएम यूबीजीएल (एचईडीपी)
4) 40 एमएम यूबीजीएल (आरपी) बरोबर घेऊन जाण्यासाठी हा अतिशय सुरक्षित दारुगोळा आहे.
40 एमएम यूबीजीएल दारुगोळ्याची संरचना आणि उत्पादन खडकी येथील दारुगोळा कारखान्याने केले असून यासाठी भारतीय उद्योगांकडून सुटे भाग मागवण्यात आले.
लष्कर आणि गृह मंत्रालय युनिटकडून हा दारुगोळा आयात करण्यात येत होता. त्यामुळे देशातच या दारुगोळ्याची संरचना तयार करून त्याचे उत्पादन घेण्याची गरज होती.
खडकी येथील दारूगोळा कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एम. के मोहपात्रा यांनी 4 ऑगस्ट 2020.रोजी 40 एमएम यूबीजीएल (प्रॅक्टिस) ची तपासणीचे पत्र सीमा सुरक्षा दलाचे डीआयजी अशोक कुमार झा यांना सुपूर्द केले.
ऑर्डिनेन्स फॅक्टरी बोर्डचे डीजीओएफ आणि अध्यक्ष हरी मोहन आणि खडकी येथील दारूगोळा कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एम. के मोहपात्रा यांनी 11 ऑगस्ट 20 रोजी ओएएफबी, एएफके आणि जेसीएमचे सदस्य आणि कृती समिती आणि संघटनाच्या सदस्यांच्या उपस्थितीत सीमा सुरक्षा दलाला 40 एमएम यूबीजीएल (प्रॅक्टिस) च्या पहिल्या खेपेला रवाना केले.
या उत्पादनामुळे खडकी येथील दारूगोळा कारखान्याने संरक्षण उत्पादनाच्या दिशेने भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि आयातीला पर्याय उपलब्ध करून देऊन बहुमूल्य परकीय चलनाची बचत करण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नात सहभागी झाले आहे.
M.Iyangar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1645421)
आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English