श्रम आणि रोजगार मंत्रालय
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील बेरोजगारांना मिळणार विद्यावेतनासह मोफत प्रशिक्षण
18 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येतील
Posted On:
09 AUG 2020 12:54PM by PIB Mumbai
नागपूर 9 ऑगस्ट
श्रम व रोजगार मंत्रालय , भारत सरकारच्या अखत्यारितील राष्ट्रीय आजीविका सेवा केंद्राच्या (नॅशनल करीअर सर्विस सेंटर) अध्यापन, सह मार्गदर्शन केंद्रा तर्फे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील बेरोजगारांना टंकलेखन प्रशिक्षण, स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन व संगणक संचालनाच्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोफत प्रशिक्षणामध्ये टंकलेखनामधील विशेष प्रशिक्षण तसेच लघुलेखन (इंग्रजी स्टेनोग्रॉफी) सामान्यज्ञान, इंग्रजीभाषा व मूलभूत संगणक ज्ञानासंबंधी ११ महिन्यांचा कालावधी असणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाची सुरुवात 1 सप्टेंबर 2020 पासून होणार सुरु होण्याची शक्यता असून यासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे,शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यावेतनाची रककम १,००० रू. दरमहा इतकी असेल. या प्रशिक्षाणाव्यतिरिक्त, संगणकाच्या हार्डवेअर व स्फॉटवेअर संबंधी १ वर्षाचा कालावधी असणारे प्रशिक्षणही उपलब्ध असून त्यासाठी वरीलप्रमाणेच शैक्षणिक पात्रता आवश्यक असून वयोमर्यादा१८ ते ३० वर्षे असणार आहे.
या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्यासाठी इच्छूक अनुसुचित जाती तथा अनुसुचित जमातीच्या पात्र उमेदवारांनी दिनांक 18 ऑगस्ट 2020 पूर्वी प्रवेशाकरीता दिलेल्या https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd6gD7qe88Oio59N-d283XZ3b7ORp0fGfLcxdiit7o-9Cj4lw/viewform ऑनलाईन लिंक वर अर्ज भरावा अथवा अधिक माहिती साठी 9730645446 या व्हाटसॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपक्षेत्रीय व रोजगार अधिकारी पी. एस. पाचपोर यांनी केले आहे.
S.Rai/D.Wankhede/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644535)
Visitor Counter : 120