माहिती आणि प्रसारण मंत्रालय

फिल्मस डिव्हीजनसोबत अनुभवा ‘भारत छोडो चळवळ’

Posted On: 07 AUG 2020 8:57PM by PIB Mumbai

मुंबई, 7 ऑगस्ट 2020

 

फिल्मस डिव्हीजनने देशाच्या इतिहासातील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर मैलाचा दगड ठरलेल्या घटनांचे मोठ्या कष्टाने पुनर्निर्माण केले आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली 8 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या ऐतिहासिक भारत छोडो चळवळीचे सेल्युलाईड पुनर्निर्माण केले आहे.-  भारत छोडोचे प्रसारण 8 ऑगस्ट 2020 रोजी या घटनेच्या 78 व्या वर्धापनदिनी, फिल्मस डिव्हीजनच्या संकेतस्थळ आणि युट्यब चॅनेलवर करण्यात येणार आहे.

माहितीपट, भारत छोडो (20 मिनिटे/कृष्णधवल/आर. कृष्णा मोहन/इंग्रजी/1985), हा एफडीच्या संग्रहातील भारतीय स्वातंत्र्यलढ्याची मालिका, या अंतर्गत प्रक्षेपित केला जाईल. यात दुसरे महायुद्ध सुरु झाल्यापासूनचा 1939 ते क्रीप्स मिशनचे भारतात आगमन, ज्यामुळे अखिल भारतीय काँग्रेसने 08 ऑगस्ट 1942 रोजी ‘छोडो भारत ठराव’ मंजूर केला होता, हा काळ आहे.

डू ऑर डाय (22 मिनिटे/कृष्णधवल/आर. कृष्ण मोहन/इंग्रजी/1985) यात भारत छोडोचा ठराव, नेत्यांची अटक आणि देशातील लोकांचे बंड हा भाग आहे. आयएनए आणि सुभाषचंद्र बोस यांची भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील भूमिकाही यात मांडण्यात आली आहे.

फिल्मस डिव्हीजनच्या https://filmsdivision.org/ संकेतस्थळावर @ “Documentary of the Week” विभागावर क्लिक करा किंवा एफडीच्या युट्यूब चॅनेल, https://www.youtube.com/FilmsDivision ला भेट देऊन 1942 च्या 'भारत छोडो चळवळ अनुभवा.

 

* * *

D.Wankhede/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644230) Visitor Counter : 125


Read this release in: English