शिक्षण मंत्रालय
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 उद्यापासून सुरु
पंतप्रधान साधणार सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद
पाच दिवस चालणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रा. एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च करणार 35 टीममधील 210 सहभागींचे आदरातिथ्य
Posted On:
31 JUL 2020 8:43PM by PIB Mumbai
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच), नवोन्मेष आणि उद्योजकांसाठीचा जगातील सर्वात मोठा खुला प्लॅटफॉर्म, उद्या 1 ऑगस्ट 2020 पासून सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मार्ट हॅकेथॉनच्या उद्घाटनाच्या दिवशी म्हणजेच 1 ऑगस्ट 2020 रोजी मुल्यांकनाच्या पहिल्या फेरीनंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 9 वाजता होईल, यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ रमेश पोखरियाल ‘निशंक’, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित राहणार आहेत. एसआयएच 2020 च्या भव्य अंतिम सोहळ्याचे सकाळी 10 वाजेपासून थेट प्रसारण करण्यात येणार आहे. सर्व सत्रांची तपशीलवार माहिती link to the schedule of SIH 2020 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोविड-19 संक्रमण परिस्थितीमुळे, एसआयएच सॉफ्टवेअर आवृत्तीचे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्या व्यवस्थापनाखाली सहभागी विद्यार्थी, संयोजक आणि उद्योग मूल्यांकनकर्ते एका डिजीटल प्लॅटफॉर्मवर एकत्र येणार आहेत.
प्राचार्य एल.एन.वेलिंगकर इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च हे मुंबई येथील हॅकेथॉनसाठीचे नोडल केंद्र आहे. संस्थेकडून 5-दिवसीय कार्यक्रमात एसआयएच सॉफ्टवेअर आवृत्ती आणि विद्यार्थ्यांचे आदरातिथ्य केले जाणार आहे. स्थानिक उदघाटनसोहळा मुंबई नोडल केंद्रावर 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी आयोजित केला जाणार आहे. यात 35 टीममधील 210 विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. सीडीके ग्लोबल, मॅथवर्क्स आणि मिक्सओरजी या तीन संस्थांच्या सात प्रॉब्लेम स्टेटमेंटवर स्पर्धा होईल. प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस आहे.
मुंबईतील कार्यक्रमाची माहिती Here is the link to the Day-wise Schedule of events in the nodal centre at Mumbai या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यावर्षी एसआयएच टीम आणि तज्ज्ञ सहभागी मंत्रालय/कंपन्या/संस्था प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामगिरीचे हॅकेथॉनदरम्यान मुल्यमापन करणार आहेत आणि संशोधनाला निधी पुरवठा करण्याविषयी आणि संस्थेत इंटर्नशिप किंवा नोकरी देण्याविषयी निर्णय घेतील.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचे सचिव अमित खरे, एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे, मुख्य इनोव्हेशन अधिकारी, मनुष्यबळ मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलचे डॉ अभय जेरे, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे प्रधान महासंचालक व्ही. व्ही. कौमुदी, पर्सिसन्ट सिस्टीमचे व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे, अॅमेझॉन इंटरनेट सर्व्हिसेस प्रा. लि. भारत आणि दक्षिण आशिया सार्वजनिक क्षेत्राचे अध्यक्ष राहुल शर्मा यांचा उदघाटन सत्रात सहभाग असेल.
एसआयएच हा राष्ट्रीय उपक्रम असून 2017 पासून नियमित आयोजित केला जातो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्याबरोबरच नवोन्मेष संस्कृती आणि समस्या सोडवण्याची मानसिकता तयार केली जाते.
हॅकेथॉनचे दोन भाग आहेत-एसआयएच सॉफ्टवेअकर आणि एसआयएच हार्डवेअर भाग. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या आतापर्यंतचे तीन भाग विविध नोडल ठिकाणी आयोजित करण्यात आले होते, जिथे विद्यार्थी, उद्योगजगताचे प्रतिनिधी आणि मार्गदर्शक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून निवडक समस्यांची उकल केली.
***
G.Chippalkatti/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642704)
Visitor Counter : 188