माहिती आणि प्रसारण मंत्रालय

फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने मुन्शी प्रेमचंद आणि महंमद रफी यांना 31 जुलै रोजी माहितीपटातून श्रद्धांजली

Posted On: 30 JUL 2020 11:57PM by PIB Mumbai

 

अत्यंत कुशल लेखक आणि कथाकार मुन्शी प्रेमचंद यांच्या 140 व्या जन्मदिनानिमित्त आणि महान पार्श्वगायक महंमद रफी यांच्या 40 व्या स्मृतिदिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म्स डिव्हिजनच्यातर्फे 31 जुलै 2020 रोजी माहितीपट दाखविण्यात येणार आहेत. `प्रेमचंद` आणि `रफी – वुई रिमेंबर यू` हे दोन माहितीपट फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावर आणि यू ट्यूब चॅनलवर मोफत प्रसारित केले जातील.

`प्रेमचंद` हा माहितीपट(20मिनिटे/हिंदी/1982) मुख्यत्वेकरून `उपन्यास सम्राट` (कथाकारांचे सम्राट) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुन्शी प्रेमचंद, यांच्यावर आधारित एक लघुचरित्रपट आहे, पी सी शर्मा यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. त्यांच्या असंख्य लघुकथा आणि कादंबऱ्यांमध्ये भारताचे ग्रामीण जीवन अतिशय सूक्ष्मपणे आणि जिवंतपणे मांडण्यात आले आहे.

`रफी – वुई रिमेंबर यू` (59 मिनिटे / हिंदी / 2010) यामध्ये अजरामर गायकाच्या आठवणी जिवंत होतात. कुलदिप सिन्हा यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या तासाभराच्या माहितीपटात रफी यांच्या आयुष्यातील विशेष क्षण, त्यांची सदाबहार गाणी आणि समकालीनांद्वारे त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.

www.filmsdivision.org   येथे भेट देऊन ``Documentary of the Week`` या विभागात क्लिक करावे किंवा FD YouTube Channel  फॉलो करावे. ही माहिती आपले स्नेही आणि प्रियजनांपर्यंत पोहोचवा.

 

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1642574) Visitor Counter : 125


Read this release in: English