अर्थ मंत्रालय

जीएसटी दक्षता पथकाने औरंगाबाद आणि नाशिक येथील मद्यनिर्मिती कारखान्यांवर टाकले छापे

Posted On: 28 JUL 2020 5:36PM by PIB Mumbai

 

24 /25 जुलै 2020 रोजी औरंगाबाद येथील बहुराष्ट्रीय मद्यनिर्मिती कारखाना आणि नाशिक येथील मळी आधारित डिस्टिलरीच्या कारखान्यांवर जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालय, औरंगाबाद प्रादेशिक विभाग आणि नाशिक प्रादेशिक विभागाच्या अधिका-यांनी एकाच वेळी छापे घातले.

छाप्या दरम्यान असे आढळून आले की, काकवी आधारित डिस्टिलरी मानवी वापरासाठी योग्य नसलेल्या मद्यासाठी  जीएसटी भरत ​​होती. मानवी वापरासाठी योग्य नसलेल्या अत्यंत मोठ्या प्रमाणातल्या मद्याची मंजुरी दडपण्यात आली आणि अशा प्रकारची मंजुरी  त्यांनी दाखल केलेल्या GSTR 3B विवरणपत्रात दिसली नाही  आणि अशा मंजुरींवर कोणताही जीएसटी भरला गेला नाही. कागदपत्रांच्या छाननीत असे दिसून आले आहे की जुलै 2017 ते 24 जुलै 2020, या काळात करदात्याने 2.09 कोटी रुपये जीएसटी अदा न करता 11.59 कोटी रुपये किमतीच्या  मानवी वापरासाठी योग्य नसलेल्या 21.09 लाख लिटर्स मद्याला मंजुरी दिली. .

छाप्यांदरम्यान असेही दिसून आले आहे की बीअरच्या उत्पादनासाठी बार्ली तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आंबवण्याच्या टप्प्याच्या आधी उदभवणारे ड्रफ  / स्पेंट वॉर्टची मंजुरी बहुराष्ट्रीय मद्य कंपनीने दडपली होती. दृफ्ट / स्पेंट वॉर्ट हे 'ड्राय  डिस्टिलर्स ग्रेन विथ सोल्युबल्स (डीडीजीएस)' किंवा 'वेट डिस्टिलर्स ग्रेन विथ  सोल्यूबल्स' (डब्ल्यूडीजीएस)पेक्षा पूर्ण वेगळे आहे. डीडीजीएस हे मद्य बनवण्याच्या प्रक्रियेच्या आंबवण्यापूर्वीच्या अवस्थेत निर्माण होते तर डब्ल्यूडीजीएस आंबवण्यानंतरच्या टप्प्यात तयार होते.  कागदपत्रांच्या छाननीत असे दिसून आले आहे की जुलै 2017 ते जून 2020  या कालावधीत करदात्याने 71,08,940 रुपये जीएसटी न भरता  12638115  किलो ड्रॅफ / स्पेंट वॉर्ट  ची मंजुरी दिली

तपासा दरम्यान कर चुकवेगिरीची बाब आढळली कि करदात्यांनी मानवी वापरासाठी योग्य नसलेल्या मद्याची निर्मिती करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वस्तू आणि सेवांवर मिळवलेला इनपुट टॅक्स क्रेडिट  योग्य प्रकारे परत जमा  केले नाही, ज्यावर कोणताही जीएसटी लागू नाही. या पार्श्वभूमीवर  करदात्यांनी 1.16कोटी रुपये  देय असलेली एकूण रक्कम भरणे अपेक्षित आहे. 

*****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641831) Visitor Counter : 168


Read this release in: English