माहिती आणि प्रसारण मंत्रालय

कारगिल विजय दिवसानिमित्त प्रादेशिक आउटरीच ब्युरो आणि पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केला वेबिनार


कारगिल युद्ध म्हणजे लोक संघर्ष ठरला. राजकीय नेतृत्व, आपल्या देशातील एकता आणि विविध स्तरातील समन्वयाने आम्हाला मदत केली: कर्नल (सेवानिवृत्त) दळवी, संचालक, सर्व्हिस प्रीपेरेटरी इन्स्टिट्यूट, औरंगाबाद

Posted On: 26 JUL 2020 11:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जुलै 2020

21 वर्षांपूर्वी, जेव्हा कारगिलच्या रणांगणावर भारतीय सैन्य निधड्या छातीने शत्रूचा सामना करीत होते तेव्हा संपूर्ण राष्ट्र त्यांच्या मागे एखाद्या पहाडासारखे उभे होते. या युद्धात अप्रत्यक्षरीत्या इतर अनेक नागरिकांचाही सहभाग होता. कर्नल (सेवानिवृत्त) अमित आर. दळवी यांनी कारगिल युद्धभूमीच्या स्मृतींना उजाळा दिला. कारगिल युद्धाच्या प्रसिद्ध छायाचित्रांपैकी एका चित्रात माल पुरवठा करणाऱ्या ट्रकला आग लागलेली दिसते. त्या ट्रकचालकाचे योगदान आपण कसे विसरू? असा भावुक सवाल त्यांनी केला. ऑपरेशन विजयमध्ये पोस्टमन, माल वाहतूकदार आणि इतरांचेही तितकेच योगदान होते. त्यावेळी, प्राधान्य तत्त्वावर सैन्याला घेऊन जाण्यासाठी रेल्वेला अनेक नियमित गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले होते. त्याचप्रमाणे रणांगणातील घडामोडींविषयी नागरिकांना माहिती देऊन पत्रकार आणि छायाचित्रकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अशाप्रकारे संपूर्ण राष्ट्र या शूर वीरांच्या पाठी उभे राहिल्याने त्यांचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढले होते. कारगिल युद्ध ही लोकचळवळ ठरली. राजकीय नेतृत्व, आपल्या देशातील ऐक्य आणि विविध स्तरातील समन्वय यामुळे आम्हाला मदत झाली, असे सेवानिवृत्त सैन्य दलाने सांगितले.

कर्नल दळवी हे औरंगाबादमधील सर्व्हिस प्रीपेरेटरी इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत. ते 26 जुलै, 2020 रोजी प्रादेशिक आउटरीच ब्यूरो, महाराष्ट्र आणि गोवा आणि पत्रसूचना कार्यालय (पश्चिम विभाग) यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये बोलत होते. (सेवानिवृत्त) कर्नल दळवी यांनी दिलेली सादरीकरणे येथे मिळू शकतात.

कर्नल दळवी यांनी त्या वेळचे अनेक प्रेरक अनुभव कथन केले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी अणू चाचण्या केल्याच्या पार्श्वभूमीवर भौगोलिक परिस्थिती अशी होती की अफगाणिस्तानमध्ये अशांतता होती तर पाकिस्तानमध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आणि सशस्त्र सेना यांच्यातील संबंध दुणावले होते आणि बघ्याची भूमिका संपवून चीन पाकिस्तानच्या मागे उभा राहिला होता. कारगिलच्या घटनेविषयी बोलताना कर्नल दळवी म्हणाले की, पाकिस्तानने बरेच काही गमावले होते.

सर्व्हिस प्रीपेरेटरी इन्स्टिट्यूटचे संचालक दळवी यांनी शत्रू दबा धरून बसलेल्या टेकडीच्या माथ्यावरील भौगोलिक रचना सुद्धा विशद केली. ते म्हणाले की,  प्रतिकूल स्थितीत असणार्‍या भारतीय सैनिकांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चढून जावे लागले. 16,000 ते 21,000 फूट उंचीवर ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी असताना हे युद्ध झाले. सेवानिवृत्त कर्नल यांनी सांगितले की,13 ते 17 जून 1999 दरम्यानच्या काळात भारतीय लष्कराला पहिला निर्णायक विजय मिळाला जेव्हा मेजर विवेक गुप्ता आणि कॅप्टन मृदुलकुमार सिंग यांच्या पथकाने टोलोलिंगला (4590 फूटउंचीवरील) यशस्वीरित्या ताब्यात घेतले त्यानंतर अंतिम विजयात कॅप्टन श्यामल सिन्हा, हवालदार जोगिंदर सिंग, रायफलमन सवांग मोरूप आणि मेजर नवदीप चीमा यांनी कडा सर केला. ते पोहोचले तेव्हा तेथे 11 पाकिस्तानी सैनिक होते. 4 शूर सैनिकांनी त्यांच्यावर मात केली आणि 28 जून 1999 रोजी 5770 फूट उंचीवर 6 00 वाजता राष्ट्रीय ध्वज फडकावला.

21 वर्षानंतर आणि भविष्यातही कारगिल विजय दिवसाचे महत्त्व सांगताना कर्नल दळवी म्हणाले, जेव्हा आपण का लढलो हे कळण्यासाठी पात्र होऊ तेव्हाच 527 शहीदांना खरी श्रद्धांजली वाहिली जाईल. जबाबदार नागरिक होण्याच्या दिशेने आपले कर्म, शुभेच्छा आणि प्रयत्न असले पाहिजेत. या संदर्भात ते असेही म्हणाले की, सोशल मीडियात शेअर होत असलेल्या संदेशांबाबत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, जिथे नागरिकांनी देशाचे हित जपले पाहिजे.

प्रादेशिक आउटरीच ब्यूरोमधील संगीत आणि नाटक विभागाचे (एस अँड डीडी) व्यवस्थापक डॉ. जे.व्ही. पंतपाटील यांनी सीमाभागात राहणाऱ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि एकाकी सैनिकांचे मनोरंजन करण्यासाठी 1967 मध्ये स्थापन केलेल्या सशस्त्र सेवा करमणूक विभागाचा इतिहास सांगितला.

दूरदर्शन कलाकार मकरंद मेसराम यांचे ‘सरजामीन-ए-हिंद पर फिर खौफ का सया ना हो’ हे गाणे यावेळी  वाजवले गेले. कारगिल योद्धांच्या पराक्रमाला श्रद्धांजली म्हणून सिंधू दर्शन कार्यक्रमांतर्गत हे गाणे तयार करण्यात आले होते.

औरंगाबादच्या फील्ड आउटरीच ब्यूरोचे सहाय्यक संचालक निखिल देशमुख यांनी सत्राचे संचालन केले. तर आभार प्रदर्शन मुंबई पत्रसूचना कार्यालयाचे उपसंचालक धिप जॉय मॅम्पीली यांनी केले.

 

 

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641457) Visitor Counter : 144


Read this release in: English