विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

एसएनबीएनसीबीएस (SNBNCBS) ने विकसित केलेल्या ॲक्टिव्ह रेस्पिरेटर मास्क आणि नॅनो सॅनिटायझर मुळे कोविड-19 पासून सुरक्षा मिळवणे शक्य

Posted On: 22 JUL 2020 4:30PM by PIB Mumbai

 

कोविड-19 या साथीच्या आजारामुळे चेहऱ्यावरच्या मास्कचा वापर सर्वांसाठी अनिवार्य ठरला आहे. मात्र, देशातील लोक जसजसे या सुरक्षा कवचाची सवय करुन घेत आहेत, त्यासोबत, त्याचे काही त्रासही जाणवू लागले आहेत. या त्रासांमुळे लोक मास्क किंवा कोविड विषाणू संक्रमणाला प्रतिबंध करु शकणाऱ्या तत्सम सुरक्षाकवचांचा वापर करणे टाळत आहेत. काही मास्कमधून श्वासोच्छवास करतांना व्यक्तीच्या शरीरात पुन्हा कार्बन डायऑक्साईड जातो, ज्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते शिवाय अधिक काळ मास्कचा वापर केल्यास, मेंदूला ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते. त्याशिवाय उच्छवासातील हवेतल्या आर्द्रतेमुळे चष्म्यावर वाफ जमा होते. मास्कच्या आत गरम वाटणे, घाम येणे असेही त्रास होत आहेत. त्याशिवाय मास्क लावल्यावर व्यक्तीच्या बोलण्यात स्पष्टता येत नाही. 

मात्र, उच्छवासासाठी हवा बाहेर जाण्याची वाट (व्हॉल्व्ह) दिलेल्या ॲक्टिव्ह रेस्पिरेटर मास्कमुळे श्वासोच्छवास घेणे आरामदायी आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील सुरक्षित झाले आहे. कोलकात्याच्या एस एन बोस राष्ट्रीय मूलभूत विज्ञान केंद्रातील प्राध्यापक समीर के पाल यांनी आपल्या चमूसह, संस्थेचे संचालक समीत कुमार रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मास्क तयार केला आहे.  केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणारी ही एक स्वायत्त संस्था आहे.

 या संस्थेमध्ये तंत्रज्ञान संशोधन केंद्रही असून त्यासाठी DST द्वारे निधीदेखील दिला जातो. या मास्क मुळे व्यक्तीला स्पष्ट बोलता येतं तसेच हवेतून जाऊ शकणाऱ्या कोणत्याही विषाणूपासून व्यक्ती सुरक्षित राहू शकेल.

त्याशिवाय, या संस्थेतील विद्यार्थ्यानी एक नॅनो सॅनिटायझर देखील विकसित केले आहे. या नॅनो सॅनिटायझरमध्ये  या संस्थेने जीवाणूरोधी थर विकसित केला आहे. या दीर्घकाळपर्यंत चालणाऱ्या सॅनिटायझर मध्ये, साध्या सॅनिटायझरच्या वापरात जाणवणाऱ्या सर्व समस्यांवर उत्तर शोधण्यात आले आहे. सध्या सॅनिटायझरमुळे त्वचेवर येणारा कोरडेपणा, जाणवणार नाही. तसेच, साध्या सॅनिटायझरचा वापर केल्यानंतर त्यावरच्या जीवाणूरोधी क्षमता फार थोडा काळ टिकतात, त्यामुळे ती व्यक्तीचे संरक्षण करण्यास पुरेशी ठरत नाही.

 

Description: SN Bose1 Description: SN Bose2

The Mask Product (Bose-Shield)

 

Description: SN Bose

The Sanitiser Product (Bosetizer)

ही दोन्ही उत्पादने DSIR ची आस्थापना, राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ (NRDC), कडून , पॉलमेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा लीमिटेडला  हस्तांतरीत करण्यात आली आहेत. येत्या पंधरा ऑगस्ट रोजी, ही दोन्ही उत्पादने बाजारात आणण्याचे उद्दिष्ट आहे.

या अभिनव उत्पादनांमुळे, सध्या बाजारात असलेले मास्क आणि सॅनिटायझरमुळे होणारे त्रास कमी होण्यास मदत होईल. DST चे सचिव प्रा आशुतोष शर्मा यांनी या उत्पादन आणि संशोधनात सहभागी असलेल्या सर्व व्यक्ती आणि संस्थांचे अभिनंदन केले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सर्वसामान्य नागरिकांसाठी वापर करणारी ही उत्पादने आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. या संशोधनासाठी निधी दिल्याबद्दल एस एन बोस संस्थेचे संचालक समित रे यांनी DST चे आभार मानले आहेत. 

*****

M.Chopade/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1640415) Visitor Counter : 165


Read this release in: Tamil