सांस्कृतिक मंत्रालय

निष्काळजीपणा आणि  दुर्लक्ष हे सायबर हल्याला कारणीभूत ठरणारे महत्वाचे घटक असल्याचे मत  सायबर सुरक्षेवर  नेहरू विज्ञान केंद्रातल्या लॉक डाऊन व्याख्यानात  व्यक्त


राष्ट्रीय सायबर गुन्हे दाखल करता येणारे केंद्रीय गृह मंत्रालयाचे पोर्टल, सायबर गुन्हे निराकरण करण्यासाठीची समर्पित यंत्रणा

Posted On: 09 JUL 2020 6:48PM by PIB Mumbai

 

मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्राने सामाजिक महत्वाच्या विषयावर आयोजित ‘लॉक डाऊन व्याख्यान मालिके’अंतर्गत आज सायबर सुरक्षा या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले. ‘सायबर सुरक्षा समजून घेतांना’ या विषयावरच्या या व्याख्यानात आणि नॅशनल क्रिटीकल इन्फोर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटरचे सल्लागार, कर्नल प्रदीप भट ( निवृत्त ) यांनी आपले विचार मांडले.

शांतता काळात आपण जितका अधिक घाम गाळतो तितका कमी रक्तपात  आपल्याला युद्धात  सोसावा लागतो’ याचा उल्लेख करून व्याख्यानाला सुरवात करत  सायबर गुन्ह्याविरोधातल्या युद्धासाठी आपण कसे सज्ज असले पाहिजे  ते कर्नल प्रदीप भट (निवृत्त) यांनी विषद केले.

सायबर सुरक्षा या विषयाने आपल्या मनात भीती निर्माण होता कामा नये. भौतिक सुरक्षेप्रमाणेच सायबर सुरक्षाही सोपी तत्वे आणि दैनंदिन आयुष्यात आपण  समजू आणि आत्मसात करू शकतो अशा सवयींवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त ठरणारे संगणक, मोबाईल फोन आणि स्मार्ट उपकरणे धोकादायक  कशी ठरू शकतात आणि सायबर गुन्ह्यांना कशी वाट देऊ शकतात हे त्यांनी स्पष्ट केले.स्मार्ट उपकरणे किंवा यंत्रे म्हणजे त्यांच्यात विविध कार्यासाठी प्रोग्राम बसवलेला असतो.

स्मार्ट उपकरणात अस्तित्वात असलेली संवाद यंत्रणा, नेटवर्किंग यंत्रणेतले विविध घटक, या उपकरणात माहिती आणि आकडेवारी कशी जमा केली जाते, प्रक्रिया कशी केली जाते, साठवली कशी जाते याबाबत त्यांनी माहिती दिली. स्मार्ट उपकरणात परस्परांमध्ये माहिती च्या आदानप्रदा नासाठीची  विविध नेटवर्क आणि घटक माहित असणे अतिशय महत्वाचे आहे कारण   याचा वापर सायबर गुन्ह्यासाठी करता येतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

 

वैयक्तिक माहिती विविध प्लॅटफॉर्म वर शेअर करण्यापासून संरक्षण करणे कसे महत्वाचे आहे याचा उल्लेख त्यांनी केला. ‘मौल्यवान‘चे रक्षण करण्यामधली पहिली पायरी म्हणजे ते ओळखणे.  मात्र सोनसाखळी, रोकड, डेबिट कार्ड, यासारख्या मौल्यवान वस्तूंप्रमाणे डिजिटल मौल्यवान बाबी ओळखणे अतिशय कठीण आहे. डिजिटल मौल्यवान म्हणजे 0s आणि 1s चा संग्रह जो बायनरी डाटा म्हणून फाइल्सच्या स्वरुपात साठवला गेलेला असतो.

वैयक्तिक डिजिटल मौल्यवान बाबींपर्यंत अधिकृत पोहोचणे शक्य आहे अशा व्यक्ती आणि संस्था असतात, उदाहरणार्थ स्वतः, विश्वासू लोक, अधिकृत सेवा देणाऱ्या सेवा पुरवठादार संस्था आणि ई प्रशासनाद्वारे नागरिकांना माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवणारे सरकार, डिजिटल इंडिया कार्यक्रम. धमकी, दुष्ट हेतू बाळगणारी  समाजातली असामाजिक तत्वे अशा मौल्यवान बाबींपर्यंत अयोग्य मार्गाने पोहोचल्यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते. 

गृह मंत्रालयाने राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदवण्यासंदर्भात https://cybercrime.gov.in. हे  पोर्टल सुरु केले असून त्यावर सायबर गुन्हयाची ऑनलाईन तक्रार दाखल करता येते. सायबर गुन्ह्यांचे निराकरण  करण्यासाठी समर्पित यंत्रणा त्यावर असल्याचे ते म्हणाले. सायबर गुन्ह्यांसंदर्भात प्रतिसाद देण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर  कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पोन्स टीम ही नोडल एजन्सी आहे.

सायबर गुन्ह्यांना कारणीभूत ठरतो तो, निष्काळजीपणा आणि  दुर्लक्ष. सायबर चोर  तो डिजिटल मौल्यवान बाबीं पर्यंत पोहोचण्यासाठी वापर कर्त्याची असुरक्षितता जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. यासाठी वापरकर्त्याच्या संवेदनशील पासवर्ड जाणून घेण्याचा किंवा त्याला फसवणूक करणारी लिंक  पाठवून त्याने टी क्लिक कारवाई यासाठी सायबर चोर प्रयत्न करतो. यातून स्मार्ट उपकरणात मालवेअर जाऊन त्या डिजिटल  मौल्यवान बाबीपर्यंत पोहोचणे चोराला शक्य होते. 

स्वतःचे आणि इतरांचे सायबर गुन्ह्यापासून संरक्षण करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या करू नये याबाबतही त्यांनी माहिती दिली. उत्तम सॉफ्टवेअर, वापरण्यात येणारी कार्यप्रणाली खात्रीशीर असल्याची आणि उत्तम स्थितीत असल्याची खातरजमा करणेवैयक्तिक माहिती असणारी मोबाईल, लॅपटॉप यासारखी साधने  खुली न ठेवणे याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे त्यांनी सांगितले.  विश्वसनीय आणि खात्रीशीर साईटवरूनच एप्स डाऊन लोड करणे आणि विविध प्लॅटफॉर्मचा वापर करताना वेगवेगळे पासवर्ड वापरणे, ठराविक काळाने ते बदलणे  यामुळेही डिजिटल मौल्यवान बाबींचे संरक्षण होऊ शकते. सोशल मिडिया, ई मेल द्वारे सोशल इंजिनियरिंग प्रयत्नांबाबतही  त्यांनी सावध केले.डिजिटल मुल्यात्मक गोष्टीं पर्यंत पोहोचण्यासाठीचा वाईट हेतूने केलेला हा प्रयत्न असू शकतो असे त्यांनी सांगितले.

भौतिक असो किंवा डिजिटल मौल्यवान बाबी असोत त्यांचे संरक्षण करण्याचा महत्वाचा घटक तोच आहे, सुरक्षितता बाळगा,बारकाईने लक्ष ठेवा आणि मग कृती करा.

****

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637810) Visitor Counter : 136


Read this release in: English