पंतप्रधान कार्यालय

संकटांच्या आव्हानांना तोंड देत यशस्वी होणे हाच भारताचा इतिहास - पंतप्रधान

Posted On: 28 JUN 2020 2:23PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतावर असे कित्येक संकटे आली आणि गेलीत परंतु भारताने न डगमगता यशस्वीपणे त्या संकटाचा सामना करत यशाचा मार्ग खेचून आणला आहे. हा भारताचा इतिहास आहे त्यामुळे वर्तमान करोना संकटाला न भीता तसेच सध्याची जी संकटांची मालिका चालू आहे त्या लक्षात घेऊन या अनलॉकडाऊन च्या काळात ‘दो गज कि दुरी’ म्हणजेच सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापरणे आणि शक्यतो घराबाहेर न पडणे, हे नियम पळून सामूहिकरीत्या या साथीचा मुकाबला करू या. पंतप्रधान पुढे म्हणाले की, या संकटांमधूनही भारत अधिकच भव्य आणि सक्षम होत बाहेर पडेल. त्यांनी यावेळी शाश्वत , सृजनशील अशा कवितेच्या ओळी म्हटल्या -.

यह कल-कल छल-छल बहती, क्या कहती गंगा धारा ?

युग-युग से बहता आता, यह पुण्य प्रवाह हमारा I

 

क्या उसको रोक सकेंगे, मिटनेवाले मिट जाएं,

कंकड़-पत्थर की हस्ती, क्या बाधा बनकर आए I

 

  • पुढे म्हणाले की भारतातही, जिथे एका बाजूला मोठमोठी संकटे येत गेली, त्याचवेळी सर्व अडचणींना दूर करत अनेक गोष्टींची निर्मिती देखील झाली. या संकट काळातच नवीन साहित्य निर्मिती, नवे शोध लागत नवे सिद्धांत मांडले असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ,आपल्या वीर जवानांनी दाखवून दिले आहे की ते कधीही भारतमातेच्या सन्मानाला कुठलीही झळ पोहचू देणार नाहीत. वीरगती प्राप्त झालेल्या मातापित्यांनी त्यांच्या नातवांना मातृभूमीच्या रक्षणासाठी सैन्यात भरती करण्याच्या निर्णयाचे ांनी स्वागत केले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, आसामच्या रजनी यांनी मला पत्राद्वारे कळविले की त्यांनी फक्त स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची शपथ घेतली असून त्या त्याचा प्रसार-प्रचारही करतील. असे संदेश, मला देशाच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत, अनेक लोक, मला पत्र पाठवून सांगताहेत की त्यांनी या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. पंतप्रधानांनी सांगितले.

त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देश, संरक्षण क्षेत्रात, जगातल्या कित्येक देशांच्या पुढे होता. आपल्याकडे अनेक आयुध निर्माण कारखाने होते. स्वातंत्र्यानंतर, संरक्षण क्षेत्रासाठी आपण जे प्रयत्न करायला हवे होते, आपल्या पूर्व-अनुभवांचा जेवढा उपयोग करुन घ्यायला हवा होता,तेवढा आपण घेऊ शकलो नाही. आज मात्र, संरक्षण क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, भारत पुढे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे.भारत स्वयंपूर्णतेच्या दिशेने पावले टाकत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की ,कित्येक वर्षे आपली अनेक क्षेत्रे लॉकडाऊनमध्येच होती. खाण क्षेत्राला व्यावसायिक लिलावांसाठी परवानगी देण्याच्या एका निर्णयाने परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला असून, अवकाश क्षेत्रातही, ऐतिहासिक सुधारणा केल्या गेल्या आहेत. या निर्णयांमुळे केवळ आत्मनिर्भर भारताला गती मिळणार नाही, तर देश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही अद्ययावत बनेल. कृषी क्षेत्रातल्या अनेक गोष्टीही लॉकडाऊन मध्ये अडकल्या होत्या. या क्षेत्रालाही आता ‘अनलॉक’ केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना, आपला शेतमाल कुठेही, कोणालाही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे,तेव्हाच, दुसरीकडे, त्यांना अधिक कर्ज मिळण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की ,भारताने आपली ताकद, नेहमी याच भावनेने वापरली आहे, भारताचा संकल्प आहे- भारताचा स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचे रक्षण. भारताचे लक्ष्य आहे—आत्मनिर्भर भारत. या लोकडाऊनच्या काळात विपरीत परिस्थितीवर मात करत समाजासाठी, देशासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या यशोगाथा पंतप्रधांनाही यावेळी सांगितल्या. कर्नाटकच्या मंडा वाली भागातील 80-85 वर्षांच्या वृद्ध कामेगौडाजी यांनी स्वमेहनतीने जल-संधारणा 16 तलाव गावाच्या अवतीभवती बांधल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

गुजरातच्या वडोदऱ इथे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकांनी मिळून वडोदऱ्यातल्या एक हजार शाळांमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग सूरू झाले आहे. असा अंदाज आहे, की यामुळे दरवर्षी सुमारे 10 कोटी लिटर वाहून जाणारे पाणी वाचवता आणि साठवता येणार आहे.

पंतप्रधानांनी सर्व जग त्यांच्या लोकांची प्रतिकारक शक्ती वाढविण्यावर जोर देत असल्याचे सांगितले त्यासाठी जगभर आता हळद, आलं तुलसी सारखे मसाल्यांच्या पदार्थांचा उपयोग करत असल्याचे सांगितले प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या या गोष्टींचा संबंध आपल्या देशाशी आहे. हे सर्व मसाल्यांचे पदार्थ भारतात जास्त उत्पादित होतात

त्यांनी लहान मुलांना त्यांच्या घरातील जेष्ठांच्या जीवन पद्धतीवर एक व्हीडिओ बनवायला सांगितला जेणे करून नवीन पिढीला जुन्या पिढीच्या जीवनपद्धतीची कल्पना येईल. त्यांनी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीनां जुने पारंपरिक खेळ पुढच्या पिढीला शिकवावे असा सल्ला दिला.

त्यांनी देशाचे दिवंगत पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त श्रद्धांजली वाहिली.

*****

B.Gokhale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1634953) Visitor Counter : 201