कृषी मंत्रालय
सेंद्रिय शेती प्रादेशिक केंद्रातर्फे ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन
Posted On:
27 JUN 2020 6:49PM by PIB Mumbai
नागपूर, 27 जून 2020
केंद्र सरकारच्या कृषी विभाग, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अमरावती रोड स्थित सेंद्रिय शेती प्रादेशिक केंद्र, गोंडखैरी, नागपूर तर्फे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सेंद्रिय शेती विषयावर ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण अवधी सात दिवस असून देशभरातील प्रशिक्षणार्थींची संख्या 100 इतकी असणार आहे. बारावी उत्तीर्ण आणि यापेक्षा अधिक शैक्षणिक असलेल्या ग्रामीण भागातील युवकांना हे प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील युवकांना प्राधान्य देण्यात येणार असून कुठल्याही वयोमर्यादेची अट राहणार नाही.
या ऑनलाईन प्रशिक्षणात सहभाग घेण्यासाठी अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती या https://ncof.dacnet.nic.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश मधील इछुक युवकांना सदर संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून तो आवश्यक माहितीसह भरुन नागपूर केंद्राच्या biofmh10[at]nic[dot]in या ईमेलवर पाठवण्याचे आवाहन नागपूरच्या प्रादेशिक सेंद्रीय शेती केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
* * *
S.Rai/D.Wankhede/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634805)
Visitor Counter : 256