भूविज्ञान मंत्रालय

हवामानखाते– रक्षक सागराचे

Posted On: 20 MAY 2020 1:30PM by PIB Mumbai

 

पणजी, 20 मे 2020  

मान्सूनचे आगमन होत आहे, त्यावेळेस आपल्याला लहरी हवामानापासून संरक्षण करण्यासाठी धावणाऱ्या शास्त्रज्ञांची आठवण होते. गोवा हवामान खात्याकडून लहरी हवामानापासून राज्याचे रक्षण करण्यासाठी अनेकविध पातळीवर कार्य केले जाते. सकाळच्या दैनंदिन हवामान वृत्तामध्ये हवामानखात्याकडून गेल्या 24 तासातील कमाल-किमान तापमान, 07.00 वाजेपर्यंतची पर्जन्यस्थिती आणि पुढील पाच दिवसांचा अंदाज दिला जातो. सकाळच्या हवामान वृत्तात शहराचे हवामान, पुढील 48 तासांसाठी कमाल आणि किमान तापमान, पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज दिला जातो. हायवे अंदाजात गोवा हवामान विभागाकडून उच्च तापमान, आकाशाची बदलणारी स्थिती, हवामानाविषयी काही सूचना असेल तर ती दिली जाते. वादळी वाऱ्यासह पावसाची माहिती संध्याकाळच्या बातमीपत्रात दिली जाते. हे हवामानाचे अंदाज संकेतस्थळावर अपडेट केले जातात आणि आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून प्रसारीत केले जातात. तसेच मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं, समाजमाध्यम व्हॉटसअप, फेसबूक आणि ट्वीटरवरुन प्रसारीत केले जातात.   

गोवा हवामान विभाग मच्छीमारांचा खऱ्या अर्थाने तारणहार आहे, हवामानखात्याकडून पाच दिवसाचा इशारा दिल्यामुळे मच्छीमारांना परिस्थितीचा अंदाज येतो. किनारी प्रदेशातील 75 किलोमीटर आणि खोल समुद्राच्या 75 किलोमीटर महाराष्ट्र आणि गोवा सागराची माहिती दिली जाते.   

  हवामान अंदाजासाठी गोवा खात्याकडून विविध उपकरणे जसे ड्राय बल्ब थर्मोमीटर, याच्या सहाय्याने भूभागालगतचे तापमान नोंदवले जाते. तर, वेट बल्ब थर्मोमीटरच्या सहाय्याने आर्द्रता मोजली जाते. कमाल आणि किमान तापमान थर्मामीटरद्वारे गेल्या 24 तासातील अचूक कमाल आणि किमान तापमान नोंदवले जाते. डिजीटल बॅरोमीटर आणि ऍनालॉग मर्क्युरी बॅरोमीटरमुळे स्थानक-पातळीपर्यंतचा वातावरणीय दाब मोजला जातो. वातकुक्कुटामुळे वाऱ्याची दिशा समजते. स्वयंचलित आणि हाताळणी करणारे (मॅन्यूअल) पर्जन्यमापक हवामानखात्याने अचूक पर्जन्यमापनासाठी ठेवले आहेत. स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र म्हापसा, आयसीएआर (जुने गोवे), पेडणे आणि वाळपई येथे तर दक्षिण IMD | Upper Air Meteorological Instrumentataionगोव्यात काणकोण येथे उभारण्यात आली आहेत. स्वयंचलित हवामान स्थानकं पणजी, जुने गोवे आणि मुरगाव येथे आहे. रेडिओसोन्डच्या माध्यमातून वातावरण माहिती घेतली जाते.      

भूकंपाविषयी माहिती-रिअल टाईम भूकंप निरीक्षण यंत्रणा गोवा हवामानखात्याने बसवली आहे, याच्या माध्यमातून अगदी कमी काळात भूकंपाची माहिती घेतली जाते. ही माहिती दिल्ली मुख्यालयाकडे स्वयंचलित प्रणालीच्या माध्यमातून पाठवली जाते. हवामानाविषयी अगदी कमी काळात म्हणजे तीन तासात पुरवली जाते. हा हवामानअंदाज ज्ञात हवामान निकष, यात रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान, हवेचा दाब याची पुढची आवृत्ती आहे. हवामानखात्याकडून नाऊकास्टसाठी डॉप्लर रडार उपकरणाचा वापर केला जातो.

दैनंदिन हवामान अंदाजाशिवाय गोवा हवामानखात्याकडून अतिमहत्वाच्या व्यक्ती गोवा भेटीवर आल्या असता व्हीव्हीआयपी हवामानअंदाज वर्तवला जातो, दाबोळी विमानतळ प्राधीकरणाला रडार डेटा पुरवला जातो यामुळे विमानांच्या आवागमनाविषयी निर्णय घेणे सोपे जाते, तसेच केंद्रावर शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भेट आयोजित केले जाते. गोवा हवामान विभागाकडून दैनंदिन हवामान चौकशीसंदर्भात IVRS सुविधा  1800-180-1717 या टोल फ्री क्रमांकावरुन पुरवली जाते.

कोविड-19 महामारी आणि लॉकडाऊनमुळे विभागापुढे आव्हान निर्माण झाले होते, पण याही परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अचूक अंदाज वर्तवला. कार्यालयाने केंद्र तसेच राज्य सरकारने कोविडसंदर्भात वेळोवेळी जाहीर केलेल्या दिशानिर्देशांचे पालन केले. मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स कर्मचाऱ्यांना पुरवण्यात आले. सार्वजनिक वाहतूक बंद असतानाही वैज्ञानिक सहाय्यक, बहु उद्देशीय कर्मचारी वर्ग आणि अधिकाऱ्यांनी वेळेत आपले कर्तव्य चोख बजावले. बहुउद्देशीय कर्मचारी वर्गाने 24 तासंची शिफ्ट केली. अशा कठीण काळातही हवामानखात्याने अद्ययावत माहिती पुरवली.   

गोवा हवामान खात्याची स्थापना लिस्बन, पोर्तुगाल येथे 29 ऑगस्ट 1946 रोजी करण्यात आली होती. त्यावेळी या विभागाचे नाव सर्विसो मेटेरॉलोजिको नॅशनल”, अंतर्गतसर्विसो मेटेरोलोजीको दो इस्तो दा इंडिया असे होते. पोर्तुगालमध्ये हवामान सेवा सुरु झाली त्यावेळेसच गोव्यातही सेवा सुरु झाली होती. नंतर ती गोवा वेधशाळा या नावाने ओळखली जाऊ लागली. ऑगस्ट 2007 पासून हवामान विभाग असे नाव दिले.

गोवा हवामान खात्याचा परिसर

***

VK/SRT/PK

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625295) Visitor Counter : 156


Read this release in: English