रेल्वे मंत्रालय
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प) कोविड विरुद्ध लढाईसाठी सज्ज
3000 मेट्रो कामगारांची आरोग्य तपासणी; डॉक्टरांचं पथक तैनात, दररोज होत आहे तपासणी
Posted On:
05 MAY 2020 2:54PM by PIB Mumbai
नागपूर, 5 मे 2020
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महा मेट्रोच्या वतीने ठोस पावले उचलण्यात आली आहेत. मेट्रो कामगारांसह कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. मेट्रो स्टेशनवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही दररोज तपासणी केली जात आहे. कामगार वसाहतीत दररोज दोन्ही वेळेस 3000 हून अधिक कामगारांना महा मेट्रोच्या वतीने सकाळी न्याहारी, चहा आणि भोजन दिले जात आहे.
प्रत्येक कामगार आणि कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून अचानक तपासणी केली जाते आणि त्यांची चौकशीही केली जाते. स्वच्छतेसंदर्भात विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही काटेकोरपणे पाळल्या जात आहेत. महा मेट्रोच्या वतीने कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक भावनाही जपल्या जात आहेत.
डॉक्टरांची टीम तैनातः
दिलेल्या सूचनांनुसार महा मेट्रोच्या वतीने कामाच्या विविध ठिकाणी आणि महा मेट्रो मध्ये कार्यरत कर्मचारी आणि रहिवासी कॉलनीमध्ये 12 डॉक्टरांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. डॉक्टरांची टीम कर्मचार्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवतआहे. याशिवाय पॅरा मेडिकल टीमबरोबरच रुग्णवाहिका देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
तीन हजाराहून अधिक कर्मचार्यांची तपासणी: इन्फ्रारेड थर्मामीटरच्या माध्यमातून कामगार आणि कर्मचाऱ्यांची तपासणी केली जात आहे. तपासलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी सुरक्षित ठेवल्या जात आहेत. तपासणी करताना, रोगाची संभाव्य लक्षणं तपासण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटरचा वापर केला जात आहे. या कर्मचार्यांमध्ये या आजारांची कोणतीही लक्षणे दिसल्यास, पुढील 14 दिवस विशेष लक्ष ठेवले जात आहे. या कर्मचार्यांनी भेट दिलेल्या ठिकाणांमध्ये आजारपणाचा काही संबंध आहे का? याबाबत माहिती माहिती घेतली जात आहे.
महा मेट्रोच्या वतीने सूचनावली:
महा मेट्रोने आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी विशेष सूचनावली तयार केली आहे. स्वच्छतेसंदर्भात विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रजेवर गेलेले अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांना त्यांच्या सुटीच्या काळातील भेट दिलेल्या ठिकाणांची माहिती देण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रकल्प प्रमुख, जनरल कन्सल्टन्ट अंतर्गत एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या केंद्राद्वारे सर्व कामांची काळजी घेण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
***
SR/ST/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621171)
Visitor Counter : 214