अर्थ मंत्रालय

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी, दर्यापूर येथे केंद्र सरकारच्या योजनांचा सर्व समाजघटकांना लाभ

Posted On: 01 MAY 2020 2:33PM by PIB Mumbai

मुंबई/अमरावती 1 मे 2020

 

करोना प्रादुर्भावामुळे 24 मार्च पासून लागू असलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे शेतकरी, मजूर तसेच महिला अशा समाजघटकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 26 मार्च रोजी घोषित केलेल्या पॅकेजचा लाभ सर्व समाज घटकांना होत असून उज्वला योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, पंतप्रधान जनधन योजना अशा योजनांचा लाभ होऊन त्यांचे जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होत आहे. असेच काही लाभार्थी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी, दर्यापूर अशा गावांमध्ये या योजनांचा लाभ मिळाल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारही मानत आहेत

अंजनगाव बारीचे रहिवासी मारोतराव खडसे जे व्यवसायाने मजूर आहेत. त्यांना या लॉकडाऊनच्या काळात 5 किलो तांदूळ मिळाल्याबद्दल त्यांच्यासारख्या मजूर लोकांना सहकार्य मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

अंजनगाव बारी येथीलच वसंत सोनार हे अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील असून त्यांना 13 एप्रिल रोजी 2 हजार रुपये हे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत मिळाले. या मिळालेल्या रकमेतून त्यांचा शेती व्यवसाय तसेच संसाराचा गाडा चालवण्यात सहकार्य झाले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं .सरकारचे कार्य हे कौतुकास्पदच आहे अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

शरद लाडेकर हेसुद्धा केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी असून त्यांना सुद्धा 5 किलो तांदूळ मिळाला असल्याने कुटुंबाला आधार मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

20 एप्रिल पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत सुमारे देशातील 8.89 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला असून 20 एप्रिल 2020 पर्यंत 17 हजार 793 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान गरीब   कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल 2020 साठी प्राप्त म्हणून 31 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 1.19 कोटी शिधापत्रिका द्वारे व्याप्त 39.27 कोटी लाभार्थ्यांना 19.63 लाख मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले आहे

अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील महिला बचत गटांच्या महिलांना सुद्धा केंद्र  शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे. या महिला बचत गटाच्या वर्धिनी पदावर असलेल्या  शिला वानखेडे यांना उज्वला योजनेअंतर्गत 774 रुपये बँक खात्यात जमा झाले आहेत. दर्यापूर येथील बचत गटाच्या महिला उज्वला भोपळे  यांनासुद्धा  जन-धन योजने अंतर्गत 500 रुपये मिळाले असल्याची माहिती दिली.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील 20.5 कोटी महिलांना जनधन खातेधारकांना त्यांच्या खात्यात प्रत्येकी 500 रुपये मिळत आहे. 22 एप्रिल पर्यंत या अंतर्गत एकूण 10 हजार 25 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.


* * *

R.Tidke/D.Wankhede/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619987) Visitor Counter : 113


Read this release in: English