रेल्वे मंत्रालय

पश्चिम रेल्वे द्वारे परिपूर्ण साधनसामग्री व्यवस्थापन; कोरोना व्यवस्थापनासाठी उत्पादनाचे उत्कृष्ट परिणाम


महालक्ष्मी येथील पश्चिम रेल्वेच्या अजून एका कार्यशाळेत उच्च गुणवत्तेच्या पीपीई सूटची निर्मिती

Posted On: 27 APR 2020 4:08PM by PIB Mumbai

मुंबई, 27 एप्रिल 2020

 

भारतातील कोरोना विषाणू महामारीतील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आघाडी वर कार्यरत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई संच आणि इतर साधनं सामुग्रीची तरतुद झाल्याने कार्याभिमुखतेसाठी प्रेरणा मिळाली आहे. पश्चिम रेवेच्या साधनसामग्री व्यवस्थापन विभागाने वैद्यकीय विभागाशी संपर्क साधून, कोविड-19 साथीच्या आजारा विरोधातील लढाईत डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि रुग्णांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा वेळेवर करण्यासाठी मुख्यालय, जिल्हा आणि विभागीय अधिकाऱ्यांचा एक समर्पित गट स्थापन केला आहे. पश्चिम रेल्वेने साधनसामग्रीच्या केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे जागतिक साथीचा  आजार कोरोनाविरूद्धच्या लढाईत सर्व प्रयत्नांचे अधिक चांगले व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी केवळ उत्कृष्ट पीपीईच नव्हे तर मोठ्या प्रमाणात स्टील बेड्स, अलगीकरण वॉर्ड्स, इनव्हसिव आणि नॉन- इनव्हसिव व्हेंटिलेटर, शरीराचे तापमान मोजण्यासाठी नॉन-कॉन्टेक्ट थर्मल गन, ऑक्सिजन सिलिंडर्स, सॅनिटायझर्स, एन-95 मास्क, चेहरा संरक्षक आवरण, आतील गाऊन, जंतुनाशक फवारणी पंप, सोडियम हायपोक्लोराइट सोल्यूशन्स इत्यादी तसेच 410 अलगीकरण कोच साठी उत्कृष्ट परिणाम मिळाले आहेत. पश्चिम रेल्वेचे  महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी उत्कृष्ट साहित्य व्यवस्थापनासाठी केलेल्या या सर्व प्रयत्नांचे कौतुक केले आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य साधनसामग्री व्यवस्थापक ज्योति प्रकाश पांडे आणि त्यांच्या संपूर्ण अधिकारी वर्गाचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंदर भाकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आघाडीवर कार्यरत असणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी पीपीई सूटची आवश्यकता लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेने संरक्षण संशोधन विकास आस्थापनाचे( डीआरडीई) आणि दक्षिण भारत वस्त्र संशोधन संघटना (सिट्रा) यांच्या सर्व मानकांचे पालन करत पीपीई संच विकसित केले. लोअर परेल कार्यशाळा आणि अगदी अलीकडे महालक्ष्मी येतील ईएमयु कार्यशाळेत स्वदेशी पीपीई सुटच्या उत्पादनासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आवश्यकतांचे पालन करत न-शिवलेले कापड आणि सीम सिलिंग टेप इत्यादी कच्च्या मालाचे व्यवस्थापन करणे ही खूप महत्वाची बाब होती. या दोन्ही कार्यशाळांमध्ये, आवश्यकतेनुसार विविध बूट कव्हरसह सुमारे 200 पीपीई सूट तयार केले जातात.

भाकर यांनी असेही सांगितले की महालक्ष्मी जनरल स्टोअर्स डेपो आणि लोअर परेल डेपोने कर्मचाऱ्यांच्या  वापरासाठी 3 प्लाय फेस मास्क देखील विकसित केले आहेत. पश्चिम रेल्वेच्या कार्यशाळेत कोविड-19 रुग्णांच्या अलगीकरण वॉर्डसाठी स्टील बेडदेखील विकसित करण्यात आले आहेत. लॉकडाउन परिस्थितीत, साधनसामुग्री व्यवस्थापन विभागाने एकत्रितपणे बिगैर वातानुकुलीत स्लीपर कोच कोविड -19 रुग्णांसाठी लागणाऱ्या अलगीकरण वॉर्डमध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक सर्व कच्चा माल प्रदान केला आहे. आतापर्यंत, कोविड-19 रूग्णांची काळजी घेण्यासाठी तब्बल 410 बिगैर वातानुकुलीत स्लीपर कोच तयार आहेत.

ते म्हणाले की, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम रेल्वेच्या साधनसामग्री व्यवस्थापन टीमने स्पॉट खरेदी समिती, आणीबाणी खरेदी इत्यादीसारख्या खरेदीच्या विविध पद्धतींचा वापर करुन तसेच नागरी अधिकाऱ्यांशी वैद्यकीय वस्तूंच्या वाहतुकीसाठी समन्वय साधून रतलाम, राजकोट, अहमदाबाद, वडोदरा, मुंबई आणि भावनगर या सहाही विभागांतील सर्व आवश्यक वैद्यकीय वस्तूंची पूर्तता केली आहे.  वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई), इनव्हसिव आणि नॉन- इनव्हसिव व्हेंटिलेटर, शरीराचे तापमान मोजण्यासाठी नॉन-कॉन्टेक्ट थर्मल गन, ऑक्सिजन सिलिंडर्स, सॅनिटायझर्स, एन-95 मास्क, चेहरा संरक्षक आवरण, आतील गाऊन, जंतुनाशक फवारणी पंप, सोडियम हायपोक्लोराइट सोल्यूशन्स इत्यादी वस्तूंची वाढती मागणी आणि पुरवठ्याचे निरिक्षण करण्यासाठी साधनसामग्री व्यवस्थापन विभागाने आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत ऑनलाईन काम करायला सुरुवात केली आहे. विभागाने तातडीने मदतीची आवश्यकता असलेल्या मुंबई आणि आसपासच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधनसामग्री संकलन टीमसह एक विशेष कृतिदल देखील तयार केला आहे. विविध स्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्स एप्लिकेशनचा आणि व्हॉट्सअॅप ग्रुपचा उपयोगकरून विभागाने त्वरित अचूक व्यवस्था करण्यास मदत केली.

कोविड-19 साथीच्या संकटाच्या वेळी, साधनसामग्री व्यवस्थापन विभागाने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणावर देखील लक्ष दिले आहे. याच उद्देशाने तयार केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कर्मचारी दररोज स्वत:ची आणि त्यांच्या कुटुंबाची आरोग्य स्थितीची ताजी माहिती अपडेट करतात. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोविड-19 उद्रेकाविरुद्धच्या लढाईत सरकारला आणि त्यांना मदत करणाऱ्या आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या व्यतिरिक्त, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल आणि प्रधान मुख्य साधनसामग्री व्यवस्थापक ज्योती प्रकाश पांडे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली साहित्य व्यवस्थापन विभागाने मालवाहू गाड्यांच्या सुरक्षित मार्गासाठी आवश्यक असलेल्या लोको स्पेअर्स, कोचिंग एसएलआर स्पेअर्स आणि वॅगन स्पेअर्स इत्यादींसह सर्व वस्तूंचा अखंडित पुरवठा सुनिश्चित केला आहे. हे केवळ साठा आणि थकबाकीचे नियमित निरीक्षण आणि मुख्यालय तसेच डेपो अधिकारी आणि र्मचाऱ्यांमधील समन्वयामुळे शक्य झाले आहे. पश्चिम रेल्वे या सर्व अपरिचित योद्ध्यांना, त्यांच्या अद्भुत समर्पण आणि कामगारांमधील सच्च्या कर्त्यव्य भावनेला सलाम करते.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1618683) Visitor Counter : 122


Read this release in: English