पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

महाराष्ट्रात उज्वला लाभार्थींना 11 लाखाहून अधिक एलपीजी सिलेंडरचे वाटप 

Posted On: 26 APR 2020 11:15AM by PIB Mumbai

 

मुंबई, 26 एप्रिल 2020

 

इंडियन ऑइलने इतर तेल विपणन कंपन्यांच्या सहयोगाने महाराष्ट्रात उज्वला (पीएमयुवाय) लाभार्थींना, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत (पीएमजीकेवाय) आतापर्यंत 11 लाखाहून अधिक एलपीजी सिलेंडरचे मोफत वाटप केले.

तेल विपणन कंपन्या आपल्या एलपीजी वितरकांमार्फत लाभार्थीपर्यंत पोहोचत असून एप्रिल,मे आणि जून 2020 मधे, वाटप करण्यात येत असलेल्या मोफत एलपीजी सिलेंडरचा लाभ लाभार्थी घेत आहेत हे सुनिश्चित करत आहेत.

मोफत रिफीलअर्थात पुनर्भरण करण्यासाठीची आगाऊ रक्कम म्हणून तेल विपणन कंपन्यांनी महाराष्ट्रातल्या 39.84 लाख (296 कोटी रुपये ) प्रधान मंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थींच्या खात्यात हस्तांतरित केली आहे. यापैकी 9.78 लाख प्रधान मंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थींच्या खात्यात 72 कोटी रुपये एकट्या इंडियन ऑईलने जमा केले आहेत.

राज्यात एप्रिल महिन्यासाठी प्रधान मंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थीकडून आतापर्यंत 13 लाख रिफीलसाठी नोंदणी झाली.त्यापैकी 11 लाख सिलेंडर पोहोचवण्यात आले आहेत.

कोविड-19 विरोधातला लढा देण्यासाठी देशभरात लॉक डाऊन सुरु असून प्रधान मंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थींना सहाय्य करण्यासाठी प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत, इंडियन ऑईल आणि इतर तेल विपणन कंपन्यांच्या सहयोगाने योजना राबवण्यात येत आहे.केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 26 मार्चला गरिबांसाठी जाहीर केलेल्या 1.72 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचा हा भाग आहे.

या योजनेंतर्गत प्रधान मंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थींना एप्रिल ते जून 2020 या काळासाठी 14.2 किलो एलपीजी सिलेंडरचे तीन रिफील किंवा 5 किलो सिलेंडरचे आठ रिफील मोफत करण्यात येत आहेत.

इंडेन एलपीजी रीफिल्साठी नोंदणी केल्यानंतर रिफीलसाठी लागणारी रक्कम इंडियन ऑईलकडून थेट माझ्या खात्यात जमा झाली.इंडेन एलपीजी कडून आज माझ्या घरी रिफील सिलेंडर पोहोचला. गरज लक्षात घेऊन विचारपूर्वक केलेल्या या मदतीबद्दल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडियन ऑईलची आभारी असल्याची भावना महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थी जयश्री डोंबले यांनी व्यक्त केली.

"हम केंद्र सरकार के आभारी हैं, हमें भी उनका साथ देना चाहिए। उज्ज्वला योजना के अंतर्गत हमें सिलेंडर मिला है और राशन भी मिला है।"-जयश्री दीक्षित,अकोला, महाराष्ट्र

केंद्र सरकार सभी उज्ज्वला लाभार्थियों को तीन महीने का सिलेंडर मुफ्त दे रही है।#IndiaFightsCorona @PIBHindi pic.twitter.com/P3a3othua0

— PIB in Maharashtra 🇮🇳 #MaskYourself 😷 (@PIBMumbai) April 16, 2020

प्रधान मंत्री उज्वला योजनेच्या 44 लाखाहून अधिक लाभार्थीसह महाराष्ट्रात 2.76 कोटी एलपीजी ग्राहक आहेत.

 

S.Tupe/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1618352) Visitor Counter : 190


Read this release in: English