PIB Headquarters
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : 2.66 कोटी मोफत उज्वला सिलेंडर वितरित
Posted On:
23 APR 2020 4:52PM by PIB Mumbai
मुंबई, 23 एप्रिल 2020
कोविड19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कठीण प्रसंगी सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत तीन महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे देशातील कित्येक कोटी महिलांना फायदा होत आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही मंगळवारी संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 1000 हून अधिक एलपीजी वितरकांशी यासंदर्भात संवाद साधला.
लॉकडाऊन दरम्यान एलपीजी सिलिंडर्सची घरापर्यंत सेवा सुनिश्चित करण्यात वितरकांनी बजावलेल्या उत्तम कामाची त्यांनी प्रशंसा केली. गरीबांना कोविड-19 विरुद्ध लढ्यात मदत करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमयूवाय) लाभार्थ्यांपर्यंत तीन मोफत एलपीजी सिलिंडर्स लवकरात लवकर पोहचवण्याचे आवाहन त्यांनी वितरकांना केले आहे.
वितरकांना कामाच्या ठिकाणी संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी सोशल डिस्टनसिंग, स्वच्छता यासारख्या मानक परिचालन प्रोटोकॉलचे पालन करत हे चांगले कार्य सुरु ठेवावे असं आवाहन प्रधान यांनी वितरकांना केलं आहे.
महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यातील कित्येक महिलांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर प्राप्त झाले आहेत. या सिलेंडर साठीची सबसिडी त्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे या महिलांकडून समाधान व्यक्त होत आहे.
लाभार्थी महिला बाईट 1 ( मराठी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेरपे गावातील जनतेला #Lockdown च्या काळात सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना, पंतप्रधान अन्न सुरक्षा योजना तसेच पंतप्रधान जनधन योजनांतर्गत लाभ मिळाल्यामुळे मोठी मदत झाली आहे- सरपंच, शेरपे, सिंधुदुर्ग#IndiaFightsCorona @PIBHindi
📹 - @airnews_mumbai pic.twitter.com/ig1fcY7iK1
— PIB in Maharashtra 🇮🇳 #MaskYourself 😷 (@PIBMumbai) April 20, 2020
https://twitter.com/PIBMumbai/status/1252148522062839814?s=08
लाभार्थी महिला बाईट 2 ( हिंदी)
महाराष्ट्र के अकोला जिले की माधुरी वसू बताती हैं कि उन्हें #PradhanMantriGaribKalyanYojana पैकेज के अंतर्गत तीन मुफ़्त सिलेंडर और अन्य सुविधाएँ मिली हैं और वे इसके लिए केंद्र सरकार की आभारी हैं।#IndiaFightsCorona @PIBHindi pic.twitter.com/upfmdFJWdh
— PIB in Maharashtra 🇮🇳 #MaskYourself 😷 (@PIBMumbai) April 19, 2020
https://twitter.com/PIBMumbai/status/1251928203083603977?s=08
कोविड19 विषाणूमुळे गरीब जनतेसमोर अनेक आर्थिक अडचणी उद्भवलेल्या आहेत त्या दूर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने हे उपक्रम जाहीर करण्यात आले आहेत.
R.Tidake/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1617491)
अभ्यागत कक्ष : 119