संरक्षण मंत्रालय
आयआयटी मुंबईपासून प्रेरणा घेत नौदलाच्या दक्षिण विभागाने बनवला अतिनील निर्जंतुकीकरण कक्ष
Posted On:
19 APR 2020 6:45PM by PIB Mumbai
मुंबई, 19 एप्रिल 2020
आय आय टी मुंबईच्या एका संशोधनाबद्दल 31 मार्च 2020 ला फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये आलेल्या एका वृत्तापासून प्रेरणा घेत, भारतीय नौदलाच्या दक्षिण विभागाने, कोविड-19 च्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी, कोच्ची येथे एक अतिनील कक्ष तयार केला आहे.
हा कक्ष तयार करण्यासाठी 5000रुपये खर्च आला आहे, यात धातूचे कंटेनर (भांडे) दोन अतिनील दिवे एकमेकांच्या समोरासमोर लावण्यात आले असून, त्या कंटेनरच्या आतल्या भागात अल्युमिनियमची फॉईल लावण्यात आली आहे. यातून अतिनील किरणोत्सार त्या कक्षाच्या प्रत्येक भागात होऊ शकेल. नौदलाच्या दक्षिण विभागातील (SNC)तज्ञ डॉक्टरांनी या उपकरणाची क्षमता तपासून प्रमाणित केली आहे.
नौदलाच्या जहाज दुरुस्ती विभागात तयार करण्यात आलेल्या या छोट्या, फिरत्या कक्षात छोट्या छोट्या गोष्टी, जशा नोटा-नाणी, सर्व प्रकारची कार्डे, पैशांचे पाकीट, डायरी, पेन, मोबाईल फोन, किल्या, गणवेषावर असलेली पदके इत्यादी तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणारी अशी सर्व उपकरणे, ज्यांना ओले करता येत नाही, ती सॅनीटाईझ होऊ शकतील.
कोरोना विषाणूचा संसर्ग वस्तूंच्या पृष्ठभागावरूनही होत असल्याने, हा कक्ष निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त ठरतो आहे.
U.Ujgare/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1616480)
Visitor Counter : 55