सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री  नितीन गडकरी यांच्यातर्फे पी.पी.ई. कीटस्‌चे वितरण

Posted On: 11 APR 2020 10:07PM by PIB Mumbai

 

नागपूर, 11 एप्रिल 2020

 

केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री  नितीन गडकरी यांनी  केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम  उद्योगमंत्रालयांतर्गत नागपूर स्थित गारमेंट फॅसिलिटी सेंटर द्वारे निर्मित पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात पी. पी.ई. कीटस्‌चे वितरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना आज केले.   आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचा-यांना सुरुवातीला 15 हजार पीपीई किट्स मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे.

कोविड -19 च्या उद्रेकाच्या सध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेतील तसेच पॅरामेडिकल कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि इतरांचे संरक्षण करणे सर्वात कठीण काम आहे. कोविड -19 च्या वाढत्या  संसर्गाच्या  तुलनेत, संसर्गापासून संरक्षण देणारी पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई) किट्सची मोठी मागणी आहे. आज नितीन गडकरी यांच्या हस्ते अशा किटस्‌चे वाटप नागपूरमध्ये करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले की, हे किटस्‌ शासनाच्या आरोग्य सेवेत कार्यरत कर्मचा-यांना कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन म्हणून काम करतील.

यावेळी एमएसएमई विकास संस्था नागपूरचे संचालक डॉ. पी.एम.पार्लेवार संचालक, यांनी किटस‌‌‌ची माहिती दिली व राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आरोग्य सेवा कामगारांसाठी पीपीई किटचे महत्त्व सांगितले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांचे अधिष्ठाता  व इतर लोकप्रतिनिधी किटस्‌ वितरणाच्या वेळी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.

पी.एम.पार्लेवार, संचालक, एमएसएमई विकास संस्था नागपूर आणि राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉमन फॅसिलिटी सेंटर (सीएफसी), ऑरेंज सिटी गारमेंट क्लस्टर यांची बैठक  आज झाली. या बैठकीमध्ये नागपूर येथील मॅन्युफॅक्चरर्स आणि मेसर्स प्लास्टी सर्ज इंडस्ट्रीज प्रा. लि., अमरावती  यांच्यासोबत जैविक  विषाणूचा धोका कमी करून लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी संरक्षक उपकरण याचे उत्पादन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या किटस्‌ची आवश्यकता आणि वैशिष्ट्यांविषयी विविध डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आहे.

 

S.Rai/D.Wankhede/P.Kor



(Release ID: 1613493) Visitor Counter : 167


Read this release in: English