शिक्षण मंत्रालय

कोविड -19 प्रादुर्भावाच्या आपत्तीपासून सुरक्षित राहण्याच्या उपायांबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने युजीसी, एआयसीटीई, एनसीटीई, एनआयओएस, एनसीईआरटी आणि केव्हीएस यांना केले अवगत

Posted On: 03 APR 2020 4:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020

कोविड -19 प्रादुर्भावाच्या आपत्तीपासून सुरक्षित राहण्याच्या उपायांबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने युजीसी, एआयसीटीई, एनसीटीई, एनआयओएस, एनसीईआरटी आणि केव्हीएस यांना अवगत केले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या या संस्थांना लिहिलेल्या पात्रात मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी सरकारने सार्वजनिक -खाजगी भागीदारीतून सुरु केलेल्या 'आरोग्य सेतू' या अ‍ॅपची माहिती दिली आहे. हे अ‍ॅप लोकांना कोरोना विषाणू संसर्ग होण्याच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यास सक्षम करेल.

हे अ‍ॅप ब्लूटूथ तंत्रज्ञान, अल्गोरिदम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन परस्पर संपर्काबाबत गणना करेल. हे अ‍ॅप विद्यार्थी, प्राध्यापक / शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी उपयुक्त ठरेल. हे अ‍ॅप पुढील दुव्यांवरून डाऊनलोड केले जाऊ शकते:

iOS :  itms-apps://itunes.apple.com/app/id505825357

Android : https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.arogyasetu

या पत्रात असेही सांगण्यात आले आहे की आयुष मंत्रालयाने लोकांनी स्वत: ची  रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी एक मार्गदर्शक प्रणाली तयार केली आहे. ती विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी फायदेशीर ठरेल.

आयुर्वेदाद्वारे  रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या उपायांसाठी कृपया येथे क्लिक करा

पत्रात असेही सुचवले गेले आहे की 3 एप्रिल 2020 रोजी पंतप्रधानांनी त्यांच्या केलेल्या विनंतीनुसार 5 एप्रिल 2020 रोजी विद्यार्थी प्रकाशाचे सामर्थ्य  जाणण्यासाठी आणि आपल्या या एकत्रित प्रयत्नांचा उद्देश जाणून घेण्यासाठी रात्री 9 वाजता  9 मिनिटांसाठी  मेणबत्ती, दिवा किंवा मोबाईलवरील बॅटरी लावू शकतात. तथापि कोणीही वसाहतीत किंवा रस्त्यावर किंवा घराच्या बाहेर कोठेही गोळा होऊ नये.

 

G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1610709) Visitor Counter : 185


Read this release in: English