पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचा क्रीडापटूंशी संवाद


कोविड-19 चा सामना करण्यासाठी सांगितला संकल्प, संयम, सकारात्मकता, सन्मान, सहयोग या पंचसूत्रीचा मंत्र

क्रीडापटूंनी देशाला सन्मान मिळवून दिला आहे, आता देशाचे मनोधैर्य उंचावण्याची आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्याची महत्त्वाची भूमिका बजावायची आहे: पंतप्रधान

पंतप्रधानांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत क्रीडापटूंनी केला सकारात्मकता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या संदेशाचा प्रसार करण्याचा संकल्प

Posted On: 03 APR 2020 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नामवंत क्रीडापटूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.

कोविड-19 हे संपूर्ण मानवतेसाठी निर्माण झालेले भयंकर संकट आहे आणि दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलावी लागण्यावरून या संकटाची तीव्रता लक्षात येऊ शकेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

या महामारीने निर्माण झालेल्या आव्हानामुळे विम्बल्डन क्रीडा स्पर्धा आणि क्रिकेटची इंडियन प्रिमियर लीगसारख्या स्थानिक स्पर्धां देखील पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.

खेळाच्या मैदानात उल्लेखनीय कामगिरी करून देशाला सन्मान मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांनी या खेळाडूंची प्रशंसा केली. आता त्यांना देशाचे मनोधैर्य उंचावण्यामध्ये आणि त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात दिलेल्या निर्देशांचे लोकांनी सातत्याने पालन करत राहावे असे जनतेला आव्हान करत सोशल डिस्टन्सिंगच्या संदेशाचा प्रसार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे असे पंतप्रधान म्हणाले. खेळांचे प्रशिक्षण घेताना आव्हानांना कसे सामोरे जायचे, स्वयंशिस्त पाळायची, सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवायचा या गोष्टी शिकवल्या जातात,आता याच सर्व गोष्टी या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी उपयोगी पडतील, ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

पंतप्रधानांनी त्यांना खालील पंचसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

महामारीच्या विरोधात संघर्ष करण्याचा संकल्प

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी संयम

सकारात्मक वृत्ती कायम राखण्यासाठी सकारात्मकता

या लढाईमध्ये आघाडीवर राहून सैनिकांप्रमाणे लढणाऱ्या वैद्यकीय समुदाय, पोलिस इत्यादींसहित इतर सर्वांचा सन्मान

आणि

वैयक्तिक तसेंच राष्ट्रीय पातळीवर पीएम- केअर्स निधीमध्ये योगदानाच्या माध्यमातून सहयोग

यावेळी त्यांनी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीच्या महत्त्वाकडे जनतेचे लक्ष वेधण्याची आणि आयुष मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचना लोकप्रिय करण्याची सूचना केली.

अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये पंतप्रधान करत असलेल्या नेतृत्वाबदद्ल क्रीडापटूंनी प्रशंसा केली. या लढ्यामध्ये आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी आणि पोलिस करत असलेल्या निष्काम सेवेची दखल घेत त्यांना जो सन्मान मिळायला हवा तो देत असल्याबद्दल या खेळाडूंनी पंतप्रधानांचे आभार मानले. शिस्त, मानसिक सामर्थ्य, तंदुरुस्ती राखण्यासाठी योग्य जीवनपद्धती आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी  आवश्यक उपाय याबाबत या खेळाडूंनी चर्चा केली.

या महामारीच्या विरोधातील संघर्षात भारताचा विजय होणार हे निश्चित आहे असे पंतप्रधानांनी सांगितले आणि या लढ्यात हे क्रीडापटू सक्रिय होतील, असा विश्वास व्यक्त केला.

भारतरत्न सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपाल, अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, कबड्डी खेळाडू आणि हिमाचल प्रदेशचे डीएसपी अजय ठाकूर, महिला धावपटू हिमा दास, दिव्यांग उंच उडीपटू शरद कुमार, टेनिसपटू अंकिता रैना, नामवंत क्रिकेटपटू युवराज सिंग, पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासह देशभरातले विविध क्रीडाक्षेत्रातले सुमारे 40 क्रीडापटू या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संवादात सहभागी झाले होते. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी देखील या संवादात सहभागी झाले.

 

 

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1610651) Visitor Counter : 270


Read this release in: English