विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 चा सामना करण्यासाठी 5 तंत्रज्ञान प्रकल्पांना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची मंजुरी

Posted On: 02 APR 2020 9:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020

 

कोविड - 19 विषाणूचा जगात झपाट्याने प्रादुर्भाव होत असून जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाला महामारी म्हणून जाहीर केले आहे. या विषाणूवर गुणकारी लस आणि  योग्य केमोथेरपीटव्ह उपचारही उपलब्ध नसल्यामुळे,जगभरात या महामारीला लोक बळी पडत आहेत.

 भारतात कोविडचा वाढता प्रसार लक्षात घेऊन या महामारीचा सामना करण्यासाठी,राष्ट्रीय संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयत्नांना सहाय्य करण्यासाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग-विज्ञान आणि अभियांत्रिकी मंडळाने, अनेक विशेष संशोधन प्रकल्प जाहीर केले आहेत.

पहिल्या 5 प्रकल्पांची, अंमलबजावणी करण्यासाठीचे  तंत्रज्ञान म्हणून पुढील विकास करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

हे प्रकल्प याप्रमाणे आहेत-

 पहिला प्रकल्प, कोविड संसर्ग ओळखण्यासाठी संभाव्य चयापचय वैशिष्ट्य  शोधण्यासाठी  तसेच  उपचारासाठी लक्ष्य ओळखण्यासाठीही  हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

 नॉव्हेल कोरोना विषाणू, SARS-CoV-2 सबंधित तीव्र श्वसन विषयक आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या अतिशय संसर्गजन्य विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या सर्जिकल मास्क सारख्या साधनांमध्ये वापरता येण्याजोगे,विषाणू नष्ट करणारे कोटिंग विकसित करण्यासाठी दुसरा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

तिसरा प्रकल्प, इनफ्लूएन्झा  विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाचा प्रसार रोखणाऱ्या  विषाणूविरोधी पृष्ठभाग कोटिंग विकसित करण्याबाबत आहे.    

पृष्ठभागावरचा विषाणू हटवण्यासाठी, संबंधित पृष्ठभाग पुसण्यासाठी उपयुक्त साहित्य चौथ्या प्रकल्पा अंतर्गत विकसित करण्यात येणार आहे. 

पाचवा प्रकल्प 2019-nCoV विषाणू अॅंटीबॉडीज चा वापर करून निष्क्रिय करण्यासंदर्भात आहे.

कोविड-19 प्रकल्पासाठीच्या विशेष तज्ञ समितीने मूल्यमापन केल्यानंतरच हे प्रकल्प निवडण्यात आले आहेत.या प्रकल्पांच्या अधिक तपशीलासाठी प्रोफेसर संदीप वर्मा, विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ सचिव यांच्याशी secretary@serb.gov.in  या ई मेल वर संपर्क साधता येईल.

 

G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1610510) Visitor Counter : 179


Read this release in: English