पर्यटन मंत्रालय

आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी ‘Stranded in India’ पोर्टलवर दोन दिवसात परदेशी नागरिकांकडून मदतीसाठीच्या 500 हून अधिक विचारणा पर्यटन मंत्रालयाला प्राप्त

Posted On: 02 APR 2020 7:42PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020

 

केंद्र सरकारच्या, पर्यटन मंत्रालयाने,31 मार्चला ‘Stranded in India’ ‘हे पोर्टल सुरु केले. पहिल्या दोन दिवसातच पोर्टलवर मदतीसाठीच्या 500 हून अधिक विचारणा/विनंती आल्या. पर्यटन मंत्रालय,परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या  समन्वयाने आणि राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने यांची दखल घेत आहे. पाहुण्या पर्यटकांना येणाऱ्या समस्यांविषयी मंत्रालय, संबंधित दूतावासांशीही समन्वय साधत आहे. परदेशी पर्यटकांकडून बहुतांश विचारणा, त्यांच्या स्वदेशी परतण्याबाबत माहिती मिळवण्यासाठी करण्यात आल्या आहेत.त्याच बरोबर त्यांना मायदेशी परतता येत नसल्यामुळे, भारतात राहण्यासाठी व्हिसाची मुदत वाढवण्याबाबत आहेत.

लॉक डाऊन संपल्यानंतर,विमानाने मायदेशी परतण्यासाठी    दिल्ली, मुंबई यासारख्या महानगरापर्यंत प्रवास  करण्यासंदर्भातही या पाहुण्यांनी विचारणा केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पर्यटन मंत्रालय,राज्य अधिकाऱ्यांसमवेत काम करत आहे. वयोवृध्द परदेशी पर्यटकांच्या ,अन्न,औषधे,सुश्रुषा यासंदर्भातल्या  विनंतीकडे तात्काळ लक्ष पुरवण्यात येत आहे.

 मंत्रालयाचा  हॉटेल संबंधित विभाग लॉक डाऊनच्या काळात परदेशी पर्यटक वास्तव्याला असलेल्या हॉटेलांच्या संपर्कात असून पाहुण्यांना येणाऱ्या समस्यांबाबत संबंधित दूतावासांशी समन्वय साधत आहे.

संबंधित समस्यांची दखल घेण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने  आपल्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारी कृती दले, केंद्र आणि प्रादेशिक स्तरावर स्थापन केली आहेत.या समस्यांचे जलद गतीने निराकरण करण्यासाठी आणि माहिती सुलभपणे पोहोचवण्यासाठी, समन्वय गट,व्हाटस्अॅप ई मेल आणि दूरध्वनीच्या माध्यमातून काम करत आहे.

1363 या अहोरात्र सुरु असणाऱ्या मदत क्रमांकावरही पर्यटकांना, अचूक आणि अद्ययावत माहिती पुरवण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी strandedinindia.com  किंवा incredibleindia.org ला भेट द्या.

 

G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor

 


(Release ID: 1610459) अभ्यागत कक्ष : 131
Read this releasein: English