इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
कोविड – 19 संसर्ग निश्चित करण्यासाठी भारत सरकारने सुरु केले “आरोग्यसेतू” नावाचे नवे ॲप
Posted On:
02 APR 2020 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020
कोविड – 19 संसर्गाशी लढा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज भारत सरकारने खासगी-सरकारी सहकार्यातून विकसित केलेले “आरोग्यसेतू” नावाचे नवे अॅप सुरु केले.
प्रत्येक भारतीय नागरिकाच्या स्वास्थ्य आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या डिजिटल इंडिया मोहिमेत हे “आरोग्यसेतू” नावाचे नवे अॅप सहभागी आहे. हे अॅप प्रत्येक नागरिकाला कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा कितपत धोका आहे याचे स्वतःलाच आकलन करून घ्यायला मदत करते. अत्याधुनिक ब्लू टूथ तंत्रज्ञान, गणिती आकडेमोड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हे अॅप प्रत्येक व्यक्तीच्या समाजातील इतर व्यक्तींशी होणारे व्यवहारांचा आधार घेऊन कोरोना संसर्गाच्या धोक्याची पातळी निश्चित करेल.
कुठल्याही व्यक्तीने त्याच्या स्मार्ट फोन मध्ये एकदा हे अॅप घेतल्यानंतर अत्यंत सोप्या आणि वापरासाठी सुलभ क्रियांमधून ते परिसरातील आरोग्यसेतू असलेले इतर फोन ओळखून घेते. या फोनपैकी कुणाचा वापरकर्ता कोविड – 19 संसर्गाने बाधित असेल तर हे अॅप अत्यंत अत्याधुनिक मानकांवर आधारित आकडेमोड करून धोक्याची पातळी ठरविते.
या अॅपने गोळा केलेली वैयक्तिक माहिती विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे गोपनीय ठेवण्यात येणार असून भविष्यात केव्हाही आरोग्य विभागाला गरज लागली तर ती फोनमधून उपलब्ध होऊ शकेल.
हे ॲप 11 भाषांमध्ये उपलब्ध असून, एकदा स्मार्ट फोनवर घेतल्यानंतर संपूर्ण देशभरात कुठेही पहिल्या दिवसापासूनच त्याचा वापर करता येईल.
G.Chippalkatti/S.Chitnis/P.Kor
(Release ID: 1610426)
Visitor Counter : 274