गृह मंत्रालय

कोविड 19 विरुद्ध लढा देण्यासाठीच्या लॉकडाऊन उपाययोजनांच्या उल्लंघनासंदर्भातील शिक्षेच्या तरतुदी मोठ्याप्रमाणत प्रसारित करण्यासाठी केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालायचे राज्यांना पत्र

Posted On: 02 APR 2020 6:30PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020

 

देशभरात कोविड-19 ची संसर्ग शृंखला तोडण्यासाठी केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने (एमएचए) भारत सरकारची मंत्रालये /विभाग आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारे /प्रशासनाला एकत्रित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

याआधी एमएचएने सर्व राज्यांना पत्र लिहून, कोविड-19 विरुद्धच्या लढाईत, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करत लॉकडाऊन उपाययोजनांची शब्दशः काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.

या संदेशाचा पुनरुच्चार करत केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्व राज्यांना कोविड 19 विरुद्ध लढा देण्यासाठीच्या लॉकडाऊन उपाययोजनांच्या उल्लंघनासंदर्भातील आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहिते अंतर्गत होणाऱ्या शिक्षेसंबधीच्या तरतुदी मोठ्याप्रमाणत प्रसारित करण्यासाठी पत्र लिहिले आहे. लॉकडाऊनच्या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी यासाठी यावर जोर देण्यात आला आहे.

राज्यांसोबतच्या पत्रव्यवहारासाठी येथे क्लिक करा

शिक्षेसंबंधीच्या तरतुदी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

G.Chippalkatti/S.Mhatre/P.Kor



(Release ID: 1610409) Visitor Counter : 169


Read this release in: English