कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
डॉ. जितेंद्र सिंग यांनी देशातील 410 जिल्ह्यातील राष्ट्रीय कोरोना सर्वेक्षण प्रसिद्ध केले
Posted On:
02 APR 2020 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, यांनी आज कोविड 19 - जिल्हाधिकारी आणि भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचे (2014-2018 तुकडी). प्रतिसाद हे राष्ट्रीय सज्जता सर्वेक्षण प्रसिद्ध केले. या अहवालाची एक प्रत https://darpg.gov.in वर उपलब्ध आहे.
स्वातंत्र्यानंतर भारताला भेडसावणाऱ्या या सर्वांत मोठ्या आरोग्य संकटाचा सामना करताना देशासमोरील शासकीय आव्हानांचा धांडोळा घेण्यासाठी कामकाजाच्या 3 दिवसात 410 जिल्ह्यांमध्ये कोव्हीड 19 राष्ट्रीय सज्जता सर्वेक्षण 2020 घेण्यात आले.
या सज्जता सर्वेक्षणाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
राज्यभरात कोविड 19 सज्जतेचे तुलनात्मक विश्लेषण विकसित करणे;
कोविड 19 सज्जतेची मुख्य प्राथमिकता आणि अडचणी अधोरेखित करणे, कारण त्या क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी सेवकांना त्या माहित असायला हव्यात
संस्थात्मक / लॉजिस्टिक्स / रुग्णालय सज्जता निर्माण करणाऱ्या सक्षम घटकांपर्यंत पोहोचणे
भारतातील जिल्ह्यांमध्ये कोविड 19 चा सामना करण्यासाठी प्रणाली आणि प्रक्रिया संबंधित त्रुटी ओळखण्यासाठी कल जाणून घेणे .
देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोविड 19 सज्जता सर्वेक्षण घेण्यात आले आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या 410 नागरी सेवकांचा प्रतिसाद जाणून घेण्यात आला. केंद्र सरकारचे सहाय्यक सचिव म्हणून काम केलेले (2014-2018) तुकडीतील जिल्हाधिकारी आणि आयएएस अधिकारी या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. 25 मार्च 2020 पासून कामकाजाच्या तीन दिवसांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधानांनी 19 मार्च 2020 आणि 24 मार्च 2020 रोजी राष्ट्राला संबोधित करताना केलेल्या भाषणात भारतीय जनतेला त्यांच्याकडील प्रत्येक संसाधनासह विषाणूचा प्रसार थोपवण्यासाठी लढा देण्याचे आवाहन केले होते. डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की कोविड १९ वरील राष्ट्रीय सज्जता सर्वेक्षणात भारताचा प्रतिसाद सुसंगत, हेतूपूर्ण आणि दृढ निर्धार असलेला आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर असलेला समन्वय प्रभावी ठरला आहे. सरकारच्या धोरणात्मक कृती - जनता कर्फ्यू, राष्ट्रीय लॉकडाउन, 1.7 अब्ज रुपयांचे आर्थिक पॅकेज , आरबीआयच्या घोषणा या उपाययोजनांना अभूतपूर्व पाठिंबा मिळाला आहे.
डॉ. जितेंद्रसिंग यांनी राष्ट्रीय लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यासाठी नागरी सेवक, डॉक्टर, परिचारिका , आरोग्य क्षेत्रातील तज्ञ, पोलिस अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांची दखल घेतली. भारताचे नागरिक जबाबदार आणि सहकार्य करणारे आहेत आणि त्यांनी कोविड १९ ची मार्गदर्शक तत्त्वे योजनाबद्ध पद्धतीने स्वीकारली आहेत असे त्यांनी अधोरेखित केलं.
हे सर्वेक्षण राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील धोरण निर्मात्यांसाठी एक मापदंड म्हणून काम करेल असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. जितेंद्रसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या क्षणी केलेल्या नेतृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले आणि आशा व्यक्त केली की, देशाचे नागरिक आणि सरकार यांच्या निर्धारपूर्ण प्रयत्नांमुळे येत्या काळात हे संकट दूर होईल.
डीएआरपीजीचे सचिव डॉ. क्षत्रपती शिवाजी, डीएआरपीजीचे अतिरिक्त सचिव व्ही. श्रीनिवास, सहसचिव जया दुबे आणि एन.बी.एस.राजपूत यांच्यासह विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे या कार्यक्रमात भाग घेतला.
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
(Release ID: 1610368)
Visitor Counter : 163