रेल्वे मंत्रालय

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी भारतीय रेल्वेची मालवाहतूक सेवा पूर्णतः कार्यान्वित

Posted On: 02 APR 2020 4:27PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020

 

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना अत्यावश्यक वस्तू आणि ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला आवश्यक वस्तूंचे वेळेवर वितरण करण्यासाठी भारतीय रेल्वेने आपली मालवाहतूक सेवा पूर्णतः सुरु ठेवली आहे.

मागील 3 दिवसांत, रेल्वेने अन्नधान्य 7,195, कोळसा 64,567, पोलाद 3,314 आणि पेट्रोलियम पदार्थ 3,838 वाघिणी मधून वितरीत करण्यात आले आहे. मागील 3 दिवसांत देशभरात 2,276 रॅक्समधून एकूण 1,43,458 वाघीणींची वाहतूक करण्यात आली.

अत्यावश्यक वास्तूंमध्ये अन्नधान्य, साखर, मीठ, फळे आणि भाजीपाला यांची मोठ्या संख्येने रेल्वे मार्गाने वाहतूक करण्यात आली.

यापूर्वी अनेक टर्मिनलवर माल उतरवणे आणि भरण्यासाठी जे अनेक प्रश्न रेल्वे समोर होते त्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही अडचणी उद्भवल्यास रेल्वे मंत्रालय गृह व्यवहार मंत्रालयाच्या सहाय्याने राज्य सरकारांशी संपर्क साधत, त्यांचे निराकरण करत आहे.

 

G.Chippalkatti/S.Mhatre/P.Kor



(Release ID: 1610304) Visitor Counter : 128


Read this release in: English