माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत कोविड-19 बाबत सत्यता पडताळणी पथक कार्यरत

Posted On: 02 APR 2020 3:58PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत नवी दिल्लीतील पत्र सूचना कार्यालयात (पीआयबी)  कोविड-19 बाबत सत्यता पडताळणी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ते आजपासून कार्यरत झाले आहे. 

pibfactcheck[at]gmail[dot]com वर येणाऱ्या मेसेजला ठराविक कालावधीत उत्तर दिले जाईल. कोविड-19 विषयीची कोणतीही अधिकृत माहिती या पथकाकडून मिळेल.

पीआयबीचे महासंचालक नितीन वाकणकर हे या पथकाचे अध्यक्ष आहेत. याव्यतिरिक्त, कोविड-19 च्या कोणत्याही तांत्रिक बाबींबाबत सर्वसाधारण लोकांच्या मनात असलेल्या शंकांबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एम्सच्या तज्ज्ञांचा समावेश असलेला एक तांत्रिक गट स्थापन केला आहे.

आपल्याला आठवतच असेल कि, जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आणि भयावह परिस्थिती निर्माण करणाऱ्या असत्यापित बातम्यांचा प्रसार होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश कालच भारतीय सर्वोच्च न्यायालयाने  मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमांसह सर्व माध्यमांना  दिले होते.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Kor



(Release ID: 1610292) Visitor Counter : 187


Read this release in: English