विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

मास्कच्या टंचाईवर मात करण्यासाठी घरी मास्क बनवा

प्रविष्टि तिथि: 02 APR 2020 3:30PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020

 

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे चेहऱ्यावरचा मास्क आणि हात धुवायच्या सॅनिटायझर्सची कमतरता झाली आहे. चिंताग्रस्त लोक घाबरून ताबडतोब स्वच्छतेच्या उत्पादनांच्या विशेषतः  मास्क आणि हात धुवायच्या सॅनिटायझर्सच्या खरेदीकडे वळल्यामुळे अचानक मागणी वाढून टंचाई निर्माण झाली.

ग्राहकांनी फेस मास्क वापरावा अशी मागणी दुकाने आणि सेवांकडून केली जात आहे.  काही दुकानांमध्ये गिऱ्हाईकांनी मास्क न वापरल्यामुळे त्यांना सेवा नाकारण्यात आली. अनेक आरोग्य तज्ञ देखील सार्वजनिक ठिकाणी फेस मास्कचा वापर करण्याची सूचना करत आहेत जेणेकरून संसर्गाचा प्रसार कमी होईल.  विशेषतः दाट लोकवस्ती असलेल्या भागात राहणा-या लोकांना मास्क घालण्याची खास शिफारस करण्यात आली आहे.

परिस्थितीवर मात करण्यासाठी, केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने मंगळवारी घरी मास्क बनवण्याविषयी पुस्तिका जारी केली आहे. यामध्ये  स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तीना स्वतः मास्क बनवण्यासाठी माहिती देण्यात आली असून मास्क तयार करणे, वापरणे आणि त्याचा पुन्हा उपयोग कसा करावा याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले आहे. याद्वारे देशभरात मोठ्या प्रमाणात मास्कच्या वापराला चालना मिळेल. हे मास्क बनवण्यासाठी आवश्यक सामुग्रीची  सहज उपलब्धता, घरी बनवण्यास सोपे आणि वापरायला सुटसुटीत आणि पुनर्वापर हे प्रमुख निकष आहेत.

घरी बनवण्यात आलेल्या मास्कचा सार्वत्रिक वापरामुळे एन-95 आणि एन-99 मास्कची मागणी कमी होण्याची शक्यता आहे, जे  प्रामुख्याने कोविड 19.  शी लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी  वापरण्यासाठी आहेत.

घरी मास्क बनवणे आणि वापरणे याबाबत सविस्तर माहितीसाठी Http://bit.ly/DIYMasksCorona  यावरून पुस्तिका डाउनलोड करा.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1610280) आगंतुक पटल : 343
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English