गृह मंत्रालय

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात लॉकडाऊन उपाययोजनांचा हेतू समजून घेत मनापासून अंमलबजावणी करण्याची केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाची राज्य/केंद्रशासित प्रदेशांना विनंती

Posted On: 01 APR 2020 10:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2020


कोविड-19 च्या संक्रमणाची शृंखला खंडित करण्यासाठी केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने भारत सरकारची मंत्रालये/विभाग आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश/प्रशासन यांच्यासाठी लॉकडाऊन उपाययोजनांवर एकत्रित मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. 

काही राज्ये / केंद्रशासित प्रदेश, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या एकत्रित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लॉकडाउन उपायांतर्गत विनापरवानगी अधिक सवलतींना परवानगी देत ​​आहेत, असे निदर्शनास आले आहे.

या निरीक्षणाचा पाठपुरावा करताना केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्व राज्यांचे प्रमुख सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना पत्र लिहून, कोविड-19 विरुद्धच्या लढाईत आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करत लॉकडाऊन उपाययोजनांचा हेतू समजून घेत मनापासून काटेकोरपणे त्यांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.   


राज्यांसोबतच्या पत्रव्यवहारासाठी येथे क्लिक करा 

केंद्रशासित प्रदेशांसोबतच्या पत्रव्यवहारासाठी येथे क्लिक करा


 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane



(Release ID: 1610153) Visitor Counter : 143


Read this release in: English