आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोव्हिड 19 संदर्भात ताजी माहिती
Posted On:
01 APR 2020 6:47PM by PIB Mumbai
मुंबई, 1 एप्रिल 2020
देशातील कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथे आज दुपारी 4 वाजता मीडिया ब्रीफिंग करण्यात आली.
त्यातील प्रमूख मुद्दे पुढीलप्रमाणे:
- कोणत्याही प्रकारची गर्दी, धार्मिक कार्यक्रम टाळावे, लॉक डाऊन करताना स्थलांतरित मजुरांची सोय करावी अशी कॅबिनेट सचिवांची सूचना - आरोग्य मंत्रालयातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
- रेल्वे मंत्रालय 20,000 रेल्वे डब्यांचे रूपांतरण 3,20,000 कॉरंटाईन विलगीकरण कक्षात करणार. लवकरच 80,000 बेड्स उपलब्ध होतील.
- औषधांचे तपासणी किट, पीपीई, मास्क यांसारख्या महत्वाच्या गोष्टींची वाहतूक विनाविलंब करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय लाईफलाईन उडान देशभरात सुरू करणार. गेल्या पाच दिवसात अशा प्रकारच्या 15.4 टन मालाची वाहतूक करण्यात आली.
- राष्ट्रीय औषध दर ऑथोरिटीच्या नवीन नियमावलीनुसार 24 प्रकारच्या वैद्यकीय उपकरणांच्या किमती नियंत्रित. यानुसार कोणत्याही वैद्यकीय उपकरणाच्या किमतीत गेल्या वर्षभरातल्या किमतीच्या दहा टक्केपेक्षा जास्त वाढ होणार नाही.
- रिलीफ कॅम्पस मध्ये मानसिक-सामाजिक समुपदेशनासाठी प्रशिक्षित तज्ञ ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.
- सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी या कॅम्प्सना भेट देण्याच्या सूचना. तांत्रिक बाबी हाताळून अफवा टाळण्यासाठी खालील ई-मेल आयडी वर शंकानिरसन होणार. technicalquery.covid19[at]gov[dot]in
- राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांकडून लॉकडाउनची योग्य अंमलबजावणी. जीवनावश्यक वस्तू पुरवठा समाधानकारक. स्थलांतरित मजुरांसाठी अन्न व निवार्याची सोय. आत्तापर्यंत 21,486 निवारा केंद्रांमध्ये, 6,75,133 नागरिकांनी आश्रय घेतला आहे.
- लोकांपर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पोचवताना अत्यंत अचूक नियोजन आवश्यक. तसेच यावेळी सोशल डिस्टनसिंग पाळणे आवश्यक अशा कॅबिनेट सचिव यांनी सूचना दिल्या आहेत.
- जानेवारीपासून पीपीई निर्यातीला आम्ही बंदी घातलीच आणि स्थानिक पातळीवरील उत्पादनावर भर दिला. पीपीई उत्पादनक्षमता आणि उपलब्धता वाढवण्याचे प्रयत्न करत आहोत. गरजेनुसार त्यांची आयात देखील केली जाईल असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
- प्रत्येकाला हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेण्याची गरज नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांना ते सध्या प्राथमिक अभ्यासानंतर दिले जात आहे. ते प्रत्येकाला देण्याबद्दल सविस्तर अभ्यासानंतरच ठरवता येईल - डॉ. रमण गंगाखेडकर, आयसीएमआर, दिल्ली
- देशात आतापर्यंत 1637 जण कोविड-19 बाधित आणि संसर्गाने आत्तापर्यंत 38 जणांचा मृत्यू. नोंदणीनुसार गेल्या चोवीस तासात 376 नवीन रुग्ण आणि 3 मृत्यू. तर 132 जणांची प्रकृती धोक्याबाहेर अशी आरोग्य मंत्रालयामार्फत माहिती देण्यात आली.
R.Tidke/M.Chopade/D.Rane
(Release ID: 1609996)
अभ्यागत कक्ष : 131