अर्थ मंत्रालय
मासिक हप्त्याची रक्कम विलंबाने देण्यासंदर्भात रिझर्व बँकेने, बँकांना दिलेल्या परवानगी संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Posted On:
01 APR 2020 5:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2020
खेळते भांडवल विषयक सुविधा आणि 1 मार्च 2020 रोजी देय असलेल्या सर्व मुदत कर्जावरचे हप्ते तीन महिने विलंबाने देण्यासंदर्भात रिझर्व बँकेने, गेल्या आठवड्यात घोषणा केली.
या संदर्भातल्या तांत्रिक बाबींविषयी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्न आणि शंकांचे भारतीय बँकेने एका “वारंवार विचारले जाणारे प्रश्न” ने निराकरण केले आहे.
प्रश्न 1 – आरबीआयची घोषणा काय आहे आणि केव्हा केली होती ?
उत्तर- खेळते भांडवल विषयक सुविधा आणि 1 मार्च 2020 रोजी देय असलेल्या सर्व मुदत कर्जावरचे हप्ते तीन महिने विलंबाने वसूल करण्याबाबत रिझर्व बँकेने, बँकांना गेल्या आठवड्यात परवानगी दिली.
प्रश्न 2- आरबीआयने दिलासा देणारे हे पॅकेज का जाहीर केले ?
उत्तर- कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे कर्ज सेवेवर निर्माण होत असलेला ताण कमी करण्यासाठी आणि व्यवहार्य व्यापार सुरळीत राखण्याची खातर जमा करण्यासाठी रिझर्व बँकेने विशिष्ट नियामक उपाययोजना जाहीर केल्या. रोकड सुलभतेत तात्पुरता व्यत्यय येण्याची आणि काही व्यवसाय /व्यक्तींना आर्थिक नुकसान झेलावे लागण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा व्यक्ती आणि व्यवसायासाठी या उपाययोजना दिलासादायी ठरतील या हेतूने जाहीर करण्यात आल्या.
प्र्श्न ३- आरबीआय कोविड-19 नियामक पॅकेज अंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? ही सुविधा सर्व ऋणकोसाठी आहे का ?
उत्तर – सर्व मुदत कर्ज (कृषी मुदत कर्ज,किरकोळ,पिक कर्ज आणि सामुहिक खरेदी अंतर्गत कर्ज यासह) कॅश क्रेडीट/ ओव्हरड्राफ्ट, या सुविधा, पॅकेज अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र आहेत. कागदपत्रांचे अनावश्यक काम टाळण्यासाठी सर्व कर्जदारांना ही सुविधा लागू राहील. मुदत कर्जाचे हप्ते (व्याजासह) भरण्यासाठी 90 दिवसांचा अधिकचा कालावधी देण्यात येईल. मुदत कर्ज फेडीच्या मूळ कालावधीला 90 दिवसांची वाढीव मुदत मिळेल. उदाहरणार्थ, 60 हप्ते आणि 1 मार्च 2025 ला परिपक्व होणारे कर्ज आता त्याऐवजी 1 जून 2025ला होईल.
प्रश्न 4- सर्व प्रकारच्या मुदत कर्जासाठी पेमेंटची पुनर्रचना लागू आहे का ?
उत्तर- विभाग किंवा मुदत कर्जाचा कालावधी लक्षात न घेता, सर्व विभागातल्या, सर्व मुदत कर्जांना हे लागू आहे.
प्रश्न 5- मुदत कर्जाची फेररचना केवळ मुद्दलाला लागू आहे की त्यामध्ये व्याजाचाही समावेश आहे ?
उत्तर- 1 मार्च 2020 ते 31 मे 2020 या तीन महिन्याच्या काळासाठी मुद्दलाची फेररचना करता येईल. उदा. मुदत कर्जाचा शेवटचा हप्ता 1 मार्च 2020 ला देय असेल तर त्याऐवजी तो आता तो 1 जून 2020 ला देय होईल.
हप्त्यावर आधारित मुदत कर्जासाठी 1 मार्च 2020 ते 31 मे 2020 या काळात देय असलेल्या तीन हप्त्यांसाठी हे लागू असेल आणि कालावधी तीन महिन्यांनी वाढेल.
इतर मुदत कर्जांसाठी या काळातले सर्व हप्ते आणि व्याजासाठी लागू होईल.
प्रश्न 6- मुदत कर्जाचा कालावधी विहित कमाल कालावधीपेक्षा किंवा कर्जाच्या धोरणात नमूद केल्यापेक्षा जास्त झाल्यास काय होईल ?
उत्तर- कोणतीही परवानगी घेण्याची गरज नसून, परवानगी न घेता अशा सर्व प्रकारच्या मुदत कर्जासाठी हे लागू राहील.
प्र्श्न 7 - खेळते भांडवल सुविधेसंदर्भात व्याजासाठी या मधे काय तरतूद आहे ?
उत्तर- कॅश क्रेडीट/ ओव्हरड्राफ्ट साठीच्या 31 मार्च, 30 एप्रिल आणि 31 मे साठीच्या व्याजाची वसुली लांबणीवर टाकण्यात येईल. तथापि संपूर्ण व्याज 30 जून 2020 पर्यंत वसूल झाले पाहिजे.
प्रश्न 8- आरबीआयच्या या पॅकेजचा, कर्ज हप्ते देण्यात कुचराई करणाऱ्या ऋणकोवर काय परिणाम होईल ?
उत्तर- उशिराने भरणा म्हणजे कुचराई मानली जाऊन क्रेडीट ब्युरोला त्याची माहिती दिली जाईल. 5 कोटी आणि त्यावरच्या कर्जासंदर्भात, बँका, थकीत विषयक स्थिती, सीआरआयएलसी मार्फत आरबीआयला कळवतात. या पॅकेजमुळे 1 मार्च 2020 नंतर तीन महिन्यापर्यंतची थकीत स्थिती बँका, क्रेडीट ब्युरोला / सीआरआयएलसीला कळवणार नाहीत. यासाठी कोणतेही दंडात्मक व्याज आकारले जाणार नाही.
प्रश्न 9- व्यवसाय/ व्यक्तीने हा लाभ घेणे अनिवार्य आहे का?
उत्तर- आपल्या रोकड सुलभतेत काही व्यत्यय आलाअसेल किंवा नुकसान झाले असेल तर आपण या पॅकेज अंतर्गत लाभ घेऊ शकता. तथापि कर्जावर देय व्याज तातडीने चुकते करायचे नसले आणि तीन महिने लांबणीवर गेले असले तरी आपल्या कर्जावर त्याची भर पडणार आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
प्रश्न 10- वसुलीसाठी बँक कर्मचारी अथवा वसुली एजंट माझ्याकडे आल्यास मी नाराज व्हावे का ?
उत्तर- याची गरज नसून, नियामक पॅकेज अंतर्गत आपण लाभ घेऊ इच्छितो असे त्या बँक कर्मचारी अथवा वसुली एजंटला सांगावे.
प्रश्न 11- माझ्या क्रेडीट कार्डावरच्या थकीत देय रकमेबाबत पॅकेजमधे काय आहे ?
उत्तर- क्रेडीट कार्डावरच्या थकीत देय रकमेबाबत, किमान रक्कम देण्याची आवश्यकता आहे. ती रक्कम भरली नाही तर क्रेडीट ब्युरोला त्याची माहिती दिली जाईल. मात्र आरबीआयच्या पत्रकानुसार, क्रेडीट कार्डावरच्या थकीत रकमेची तीन महिने माहिती दिली जाणार नाही.
मात्र जी रक्कम चुकती केलेली नाही त्यावर क्रेडीट कार्ड जारी करणाऱ्याकडून व्याज आकारले जाईल.
प्रश्न 12- नॉन फंड ते फंड बेस आणि व्यवसायासाठी एफबी ते एनएफबी असा बदल करण्याबाबत काय तरतूद आहे?
उत्तर- 1 मार्च ते 31 मे 2020 या काळात, अंतर बदलासाठीच्या फंड बेस भागाचे व्याज या पॅकेजमधल्या लाभासाठी पात्र राहील.
प्रश्न 13- व्यवसायाला आणखी कोणत्या मार्गाने दिलासा देण्यात आला आहे ?
उत्तर- रोकड सुलभतेत किंवा खेळते भांडवल च्र्क्रात अडथळा आल्यामुळे, बँकेने, आपल्या या भांडवलाच्या आवश्यकतेचे पुनर्मुल्याकन करावे अशी विनंती, व्यवसायाकडून केली जाऊ शकते.
प्रश्न 14- एनबीएफसी/एमएफआय/एचएफसी, ‘इझिंग ऑफ वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग’ अंतर्गत पात्र आहेत का ?
उत्तर- या योजने अंतर्गत सध्यातरी यांचा विचार करण्यात आलेला नाही. मात्र नुकत्याच जारी केलेल्या टार्गेटेड लॉंन्गर टर्म रिफायनान्सिंग ऑपरेशन अंतर्गत त्यांना पुरेशी तरलता राहावी यासाठी आरबीआयने तरतूद केली आहे.
प्रश्न 15- आरबीआयच्या या सर्व उपाय योजना’पुनर्रचना ’ म्हणून मानल्या जातील का ?
उत्तर- कोविड-19 नियामक पॅकेजसंदर्भातल्या आरबीआयच्या 27 मार्च 2020 च्या परिपत्रकातील उपाययोजना’पुनर्रचना’ म्हणून मानण्यात येणार नाहीत.
प्रश्न 16- एसआय/ईसीएस/एनएसीएच द्वारे वसूल करण्यात येणाऱ्या ईएमआय आणि हप्त्याबाबत काय ? ऋणकोने ईएमआय परत करण्याची मागणी केल्यास त्यासाठी काय पद्धती राहील ?
उत्तर- सुधारित आदेशासाठी आपल्या बँकेशी संपर्कात राहा.
G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1609967)
Visitor Counter : 677