गृह मंत्रालय

निजामुद्दीन येथील संमेलनानंतर कोविड-19 ची लागण झालेल्या देशातील तबलिग जमात कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना अलगीकरण आणि विलगीकरणात ठेवण्यासाठी सरकार वचनबद्ध


गृह मंत्रालयाने तेलंगणामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर 21 मार्च, 2020 रोजी सर्व राज्यांना तबलिग जमात कार्यकर्त्यांची सविस्तर माहिती दिली होती

आतापर्यंत 1339 तबलिग जमात कार्यकर्त्यांना नरेला, सुलतानपुरी आणि बक्करवाला विलगीकरण केंद्रात तसेच रुग्णालयात हलविण्यात आले आहे

राज्य पोलिस या सर्व परदेशी तबलिग जमात कार्यकर्त्यांच्या व्हिसाची तपासणी करतील आणि व्हिसा अटींचे उल्लंघन झाले असल्यास पुढील कारवाई करतील

Posted On: 31 MAR 2020 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मार्च 2020


 

केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) तेलंगणामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर 21 मार्च, 2020 रोजी सर्व राज्यांना भारतीय आणि परदेशी तबलिग जमात कार्यकर्त्यांची  सविस्तर माहिती दिली होती.  

कोविड -19 ची लागण झालेल्या तबलिग जमात कार्यकर्त्यांची ओळख पटवून त्यांना अलगीकरण आणि विलगीकरण केंद्रात ठेवण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना तसेच दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. 28 आणि 29. मार्च रोजी गुप्तवार्ता विभागाने देखील सर्व राज्यांच्या महासंचालकांना पुन्हा एकदा सूचना जारी केल्या. 
दरम्यान दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मर्कझमध्ये राहणाऱ्या तबलिग जमात कार्यकर्त्यांनाही राज्य प्रशासनाने तसेच वैद्यकीय तपासणीसाठी तयार केले. 29, मार्चपर्यंत 162 कार्यकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यांना विलगीकरण सुविधांमध्ये हलविण्यात आले. आतापर्यंत 1339 तबलिग जमात कार्यकर्त्यांना नरेला, सुलतानपुरी आणि बक्करवाला विलगीकरण सुविधेत तसेच एलएनजेपी, आरजीएसएस, जीटीबी, डीडीयू रुग्णालये आणि एम्स, झज्जर येथे हलविण्यात आले आहे. अन्य कार्यकर्त्यांची सध्या कोविड-19 संदर्भात वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
साधारणपणे भारतात येणारे तबलिग जमातशी संबंधित सर्व परदेशी नागरिक पर्यटक व्हिसाच्या जोरावर येतात. गृह मंत्रालयाने यापूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती की त्यांनी पर्यटक व्हिसावर मिशनरी कामात सहभागी होऊ नये. राज्य पोलिस या सर्व परदेशी कार्यकत्यांच्या व्हिसा श्रेणीची तपासणी करत असून व्हिसा अटींचे उल्लंघन झाल्यास पुढील कारवाई केली जाईल.
पार्श्वभूमी 

तबलीग जमात मुख्यालय (मर्कझ) निजामुद्दीन, दिल्ली येथे आहे. देशभरातून तसेच परदेशातून मुस्लिम धार्मिक उद्देशाने मर्कझला भेट देतात. काही लोक तबलीग उपक्रमांसाठी देशातील वेगवेगळ्या भागांमधून गटाने येतात.  वर्षभर हे सुरु असते.
21 मार्च रोजी सुमारे 824 परदेशी तबलीग जमात कार्यकर्ते देशाच्या वेगवेगळ्या भागात मिशनरी कार्यासाठी गेले होते. याशिवाय सुमारे 216 परदेशी नागरिक मर्कझमध्ये राहत होते. या व्यतिरिक्त, सुमारे 1500 भारतीय तबलीग जमात कार्यकर्ते देखील मर्कझमध्ये राहत होते तर सुमारे 2100 भारतीय कार्यकर्ते देशाच्या विविध भागांमध्ये मिशनरी कार्यासाठी जात होते. 23 मार्चपासून निझामुद्दीनच्या आसपास आणि संपूर्ण दिल्लीत प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली होती.

Click here to see document on Tabligh Activities in India

 

 

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 


(Release ID: 1609822) Visitor Counter : 300


Read this release in: English