रेल्वे मंत्रालय
विलगीकरणाची गरज पडल्यास 3 लाख 20 हजार खाटा मावतील अशी डब्यांची फेररचना करायला भारतीय रेल्वे सज्ज
कोविड-19 च्या रुग्णांसाठी आवश्यक त्या सुविधांनी सुसज्ज अशा विलागीकरण डब्यांची व्यवस्था करायला सुरुवात
सुरुवातीला 80,000खाटा समावणाऱ्या डब्यांची निर्मिती
विविध परिमंडळात डब्यांची फेररचना
Posted On:
31 MAR 2020 7:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2020
कोविड-19 बाबत देशात सुरु असलेल्या विलगीकरण प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी 20 हजार डब्यांचे विलगीकरण/अलगीकरण कक्षांमध्ये रूपांतर करायचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी सशस्त्र दल,वैद्यकीय सेवा, विविध रेल्वे परिमंडळातील वैद्यकीय विभाग आणि भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत आयुष्मान भारत इत्यादी विभागांशी सल्लामसलत सुरु होती. रेल्वेच्या पाच परिमंडळांनी विलगीकरण/अलगीकरण कक्षाचे प्रारूप बनविले आहे. रेल्वेच्या या फेररचना केलेल्या 20 हजार डब्यांमध्ये अलगीकरणाची गरज पडल्यास 3 लाख 20हजार खाटा मावतील. सुरुवातीला 5 हजार डब्यांचे विलगीकरण/अलगीकरण कक्षात रूपांतरण सुरु केले आहे. 80,000 खाटा मावतील अशी क्षमता या 5 हजार डब्यांची आहे. एका डब्यात साधारण 16अलगीकरणासाठीच्या खाटा मावण्याची अपेक्षा आहे.
या विलगीकरण/अलगीकरण कक्षात रूपांतरण करण्यासाठी आयसीएफ अर्थात इंटिग्रल कोच फॅक्टरीचे वातानुकूलित नसलेले शयनयान डबेच वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एका भारतीय बनावटीच्या शौचालयाचे बाथरूममध्ये रूपांतरण करण्यात येणार असून त्यात बादली, मग,साबण असे साहित्य असेल. वॉशबेसिनमधील नळाला लिफ्टसारखे हॅन्डल असेल. अशाप्रकारचा नळ योग्य उंचीवर असेल जेणेकरून बादली भरता येईल.
न्हाणीघराजवळील पहिल्या केबिनमध्ये रुग्णालयात लावतात तसे किंवा प्लास्टिकचे दोन पडदे जायच्या वाटेवर आडवे लावलेले असतील जेणेकरून संपूर्ण आठ बर्थ केबिनमध्ये जाणाऱ्या येणाऱ्यांचे स्क्रिनिंग होईल. ही केबिन साठवण किंवा निमवैद्यकीय विभाग म्हणून वापरण्यात येईल. वैद्यकीय विभागामार्फत दोन ऑक्सिजन सिलिंडर देण्यात येतील त्यासाठी या केबिनच्या जवळ असलेल्या बर्थवर ते ठेवण्याची सोया करण्यात येईल.
प्रत्येक डब्यातील मधले दोन बर्थ काढून टाकण्यात येणार असून वैद्यकीय सामुग्री ठेवण्यासाठी प्रति बर्थ दोननुसार प्रत्येक केबिनमध्ये पाण्याची बाटली ठेवण्याचे स्टॅन्ड लावले जातील. प्रत्येक डब्यात अतिरिक्त 3 हुक (खुंट्या), बसवल्या जातील.हवा खेळती राहील अशी मच्छरदाणीही प्रत्येक खिडकीवर लावण्यात येईल. कचरा टाकण्यासाठी प्रत्येक डब्यात लाल, निळ्या आणि पिवळ्या रंगाचे, पायाच्या साहाय्याने उघडझाप करता येणारे, कचऱ्याच्या पिशव्या लावलेले डबे ठेवले जातील.विद्युत अवरोधक म्हणून छताला आणि खिडकीच्या खाली आणि वरती बांबूची तावदाने लावली जातील जेणेकरून डब्यात उष्णतासुद्धा राखली जाईल. मोबाईल,लॅपटॉपच्या चार्जिंगचे पॉईंट कार्यरत असतील. जेव्हा या डब्यांची मागणी असेल तेव्हा ते सर्व सुखसोयींनी युक्त असतील.
सुरुवातीला 5 हजार डब्यांचे रूपांतरण करण्यासाठी परिमंडळ स्तरावर अशी रचना असेल:-
Sl. No.
|
Zone
|
Number of
Coaches to be Converted
|
Sl. No.
|
Zone
|
Number of
Coaches to be Converted
|
1.
|
CR
|
482
|
9
|
NWR
|
266
|
2.
|
ER
|
338
|
10
|
SR
|
473
|
3.
|
ECR
|
208
|
11
|
SCR
|
486
|
4.
|
ECoR
|
261
|
12
|
SER
|
329
|
5.
|
NR
|
370
|
13
|
SECR
|
111
|
6
|
NCR
|
290
|
14
|
SWR
|
312
|
7.
|
NER
|
216
|
15
|
WR
|
410
|
8
|
NFR
|
315
|
16
|
WCR
|
133
|
या रेल्वे डब्यांच्या अलगीकरण/विलगीकरण कक्ष रूपांतरणानंतर त्याच्या क्रियान्वयन आणि वापरासंबंधी रेल्वे आरोग्य सेवेचे महासंचालक विस्तृत प्रमाणित कार्यप्रणाली जारी करतील. या रूपांतरण प्रक्रियेसाठी सर्व रेल्वे परिमंडळांनी त्वरित नियोजन करावे आणि तयारी झाल्यावर तसे रेल्वे मंडळाला कळवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
U.Ujgare/V.Joshi/P.Kor
(Release ID: 1609662)
Visitor Counter : 201