आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कार्यालये तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे
Posted On:
31 MAR 2020 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2020
देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक, सामाजिक, पातळीवर काय प्रयत्न केले पाहिजे याबाबत जनजागृतीही करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे कोव्हिड 19 च्या संसर्गाला आळा घालण्यासाठी स्वच्छता राखणे होय.
या विषाणूचा आजार आणि प्रसार खोकला आणि शिंकेतून बाहेर पडणाऱ्या थेंबामधून बाहेर पडत असतात. खोकल्यातून आणि शिंकेतून बाहेर पडलेले थेंब हवेतील धुलीकणासोबत पृष्ठभागावर पडतात. त्यामुळे वैयक्तिक स्तरावर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली जाणं खूप महत्त्वपूर्ण आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कशी स्वच्छता राखली जावी यासंदर्भात केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
R.Tidke/S.Tupe/P.Kor
(Release ID: 1609654)
अभ्यागत कक्ष : 94