वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आंतरराष्ट्रीय सीमांदरम्यान औषधांच्या देवाण-घेवाणीत आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांच्या प्रवासासाठी आणखी सुलभता  आणण्याची भारताची मागणी


भारत हा प्रभावी आणि उच्च दर्जांच्या औषधांचा खात्रीशीर आणि किफायतशीर स्रोत असल्याचे पियुष गोयल यांचे प्रतिपादन

G-20 समूहातील व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांचा व्यापाराच्या दृष्टीने मालवाहतुकीचे जाळे अडथळ्याविना सुरळीत ठेण्याचा आणि बाजारपेठ खुली ठेवण्याचा निर्णय

Posted On: 31 MAR 2020 4:48PM by PIB Mumbai

 

 

नवी दिल्ली, 31 मार्च 2020

 

महामारीच्या संकटाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमांदरम्यान औषधांची देवाण-घेवाण तसंच आरोग्य क्षेत्रातल्या व्यावसायिकांसाठी ये-जा करण्यात आणखी सुलभता यावी म्हणून जागतिक पातळीवर  रचनात्मक काम होण्याची मागणी भारताने केली आहे. G-20 देशांच्या व्यापार आणि गुंतवणूक या विषयावरच्या चर्चेदरम्यान भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सध्या उभ्या ठाकलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक बहुस्तरीय जबाबदाऱ्या तसेच त्यात सुधारणा करणे यावर भर दिला.

अनेक आव्हानांना तोंड देत असूनही  जगातल्या 190 देशांसाठी भारत हा प्रभावी  तसेच उत्तम दर्जा असलेली औषधे आणि औषधी उत्पादनांचा खात्रीशीर आणि किफायतशीर स्रोत आहे, असे पियुष गोयल म्हणाले. “सुधारित नियमावली, संशोधन आणि विकास या क्षेत्रातला समन्वय यामुळे अशा संकटात जगाला मदत मिळवून देण्याची भारताची क्षमता नक्कीच अजूनही वाढेल असा आम्हाला विश्वास आहे. यासंदर्भातील असमर्थतेचे निराकरण करण्यासाठी, गरीबांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि शारिरस्वास्थ्याची हमी  देणे आवश्यक आहे.”

या कठीण प्रसंगी सगळं जग एकत्र आल्याची भावना व्यक्त करत मंत्री महोदयांनी सर्वच आघाडीवर लढणारे आरोग्य कर्मचारी, सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रातले कर्मचारी तसेच महामारीशी लढा देत असतानाही सर्व अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी ज्या सर्वांचे योगदान लाभले त्या सर्वांच्या मागे भारत उभा आहे अशी भावना व्यक्त केल. विकसनशील तसेच अविकसित देशांकडे साधन संपत्ती, पायाभूत सुविधा आणि तांत्रिक क्षमता  या बाबींचा अभाव असल्यामुळे या अभूतपूर्व महामारीशी सामना करणं जास्त कठीण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अशा अभूतपूर्व आव्हानांच्या वेळी नवनिर्मिती, जागतिक पातळीवरील सहकार्य आणि सक्रिय प्रतिसादाची आवश्यकता निर्माण होते. असे गोयल म्हणाले. कुठल्याही व्यवसायाच्या मुळाशी असलेली विकासाची गरज तसंच इतर बाबी लक्षात घेऊन त्यानुसार असलेल्या नियमाधारित बहुस्तरीय व्यवस्था यांना केंद्रस्थानी ठेवूनच  आपली सामूहिक कृती अस्तित्वात येणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.  “महत्वाची असलेली औषधे आणि अन्नधान्य यांच्यासोबतच देशातंर्गत नागरिकांना आवश्यक असलेला इतर महत्वाचा माल आणि सेवा यांचा सुरळीत पुरवठा होणे आवश्यक आहे. व्यापारसंबंधीत सुविधा सुरु ठेवणे किंवा गरज भासल्यास तात्पुरत्या  निर्माण करणे , त्यासाठी सीमा शुल्कनिर्यातदारांना आवश्यक असलेले बँकांची मूळ कागदपत्रे अशा अनेकविध मंजुरींच्या बाबींना थोडेफार बाजूला ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. याशिवाय  अत्यंत महत्त्वाची औषधी उत्पादने, वैद्यकीय उपकरणे, निदान करणारी उपकरणे आणि परीक्षण संच तसेच आरोग्य क्षेत्रातले व्यवसायिक ह्यांना अल्पकालीन सूचनांवर सीमा ओलांडता याव्यात यासाठी सर्वसहमतीने नियमावली अस्तित्वात आणण्यावर आम्ही विचार करत आहोत. या महामारीशी लढत असतानाच जागतिक अर्थव्यवस्था सुरक्षित राखण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारात चढ-उतार होऊ नयेत म्हणून आपल्या नेत्यांच्या आदेशानुसार आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे तसेच जागतिक बाजारातील चढ-उतारांचा परिणाम न होऊ देता सुरक्षित, योग्य स्थिर आणि नियमाधारित जागतिक व्यापार व्यवस्था राखण्यासाठी जागतिक पातळीवरील सहकार्याचा फायदा स्वतःच्या नागरिकांना व्हावा  तसेच आवश्यकता भासल्यास माणुसकीच्या दृष्टीने सर्वसमावेशक भविष्य लक्षात घेऊन SDG- 2030 यानुसार असलेली आपली बांधिलकी लक्षात घेऊन सर्वांनी ह्या दिशेने काम करणे आवश्यक आहे.”

G-20 समूहातील व्यापार आणि गुंतवणूक मंत्री तसेच निमंत्रित राष्ट्रे यांनी व्यापाराच्या दृष्टीने सुरळीत आणि  विनाव्यत्यय मालवाहतुकीचे जाळे आणि खुली बाजारपेठ ठेवण्याचा निर्णय घेतला.

Covid-19 महामारीने जगाला दिलेले आव्हान लक्षात घेऊन तसेच त्या पार्श्‍वभूमीवर सर्वसमावेशक जागतिक सहकार्याची गरज असल्यामुळे हे चर्चासत्र कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले.

चर्चासत्राच्या शेवटी जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार  मानवी जीवनाच्या सुरक्षेची गरज लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय समुदायाने सहकार्य आणि समतेच्या तत्त्वानुसार काम करणे तसेच या संकटानंतरच्या आर्थिक पडझडीला तोंड देण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे तसेच शाश्वत, संतुलित आणि  सर्वसमावेशक वाढीची गरज अधोरेखित केली.

Covid-19 ला तोंड देण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांनुसार तातडीची बंधने ही आवश्यक असली तरी ती नेमकी, यथायोग्य, आणि अस्थायी स्वरूपाची असणे आवश्यक आहे. तसेच त्यामुळे व्यापार किंवा जागतिक पातळीवरच्या मालाच्या पुरवठ्याला विनाकारण कोणतीही बाधा येता कामा नये. तसेच ही बंधने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांना अनुसरून असायला हवीत.

नागरिकांचे हित आणि आरोग्य लक्षात घेऊन अत्यावश्यक वैद्यकीय साधने, उपकरणे महत्वाची कृषी उत्पादने आणि इतर महत्वाची साधन सामग्री आणि सेवा यांचा  पुरवठा आंतरराष्ट्रीय सीमांवरून सुरळीत सुरू राहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत  .

राष्ट्राच्या गरजेनुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत चालू राहण्यासाठी आम्ही आवश्यक उपाययोजना करत आहोत आवश्यक औषध आणि फार्मा उत्पादने किफायतशीर दरात तसेच  जिथे अत्यंत गरज आहे तिथे योग्य आणि न्याय  प्रमाणात लवकरात लवकर उपलब्ध व्हावीत यासाठी गरज भासल्यास त्यांचे प्रोत्साहनाव्दारे जास्त उत्पादन घेणे व त्यासाठीची जास्त गुंतवणूक या बाबींना आम्ही राष्ट्रहित लक्षात घेऊन पाठिंबा देतो. नफेखोरी आणि अन्याय्य किंमतवाढीच्या विरोधात आम्ही ठाम आहोत,असेही निवेदनात म्हटले आहे.

 

G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor


(Release ID: 1609573) Visitor Counter : 169


Read this release in: English