पर्यटन मंत्रालय

भारतातील विविध भागात अडकलेल्या परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी पर्यटन मंत्रालयाने सुरु केले ‘Stranded in India’ हे संकेतस्थळ

Posted On: 31 MAR 2020 4:40PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 31 मार्च 2020

 

भारतात अडकलेल्या परदेशी पर्यटकांसाठी भारतीय पर्यटन मंत्रालयाने संकेतस्थळ सुरु केले आहे. Stranded in India’ असे या संकेतस्थळाचे नाव असून मायदेशापासून दूर असलेल्या या परदेशी पर्यटकांना भारतात मिळणाऱ्या सुविधांची माहिती उपलब्ध करून देणे, हा या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

संपूर्ण जगाला कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि पर्यटकांची, विशेषत: परदेशातून प्रवास करणार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यानुसार पर्यटन मंत्रालय सतत जागरुक राहून गरजूंना मदत करण्यासाठी विविध उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे.

'strandedinindia.com' या संकेतस्थळावर खालील माहिती आहे, जी पर्यटकांना गरजेनुसार उपयुक्त ठरेल.

a) कोविड-19 बाबत विदेशी पर्यटक मदतीसाठी संपर्क साधू शकतील अशा हेल्पलाइन क्रमांक किंवा कॉल सेंटरची विस्तृत माहिती.

b) परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षांचे क्रमांक आणि इतर सविस्तर माहिती.

c)  राज्य-आधारित / प्रादेशिक पर्यटन आधारभूत पायाभूत सुविधांविषयी माहिती.

d) अधिक माहितीची आवश्यकता असलेल्यांना मदत करण्यासाठी आणि परदेशी पर्यटकांना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क स्थापित करण्यासाठी मदत सहाय्य विभाग.

पर्यटन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर तसेच त्याच्या संलग्न संकेतस्थळावर हे संकेतस्थळ उपलब्ध असेल.

कृपया अधिक माहितीसाठीstrandedinindia.com किंवा incredibleindia.org या संकेतस्थळांना अवश्य भेट द्या.

 

U.Ujgare/V.Joshi/P.Kor


(Release ID: 1609567) Visitor Counter : 264


Read this release in: English