गृह मंत्रालय
कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात कुचराई केल्याबद्दल राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीमधील चार अधिकाऱ्यांविरोधात सुरु केली शिस्तभंगाची कारवाई
Posted On:
29 MAR 2020 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मार्च 2020
कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005अंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या अध्यक्षांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यास जबाबदार असलेल्या खालील अधिकाऱ्यांनी प्रथमदर्शनी ते न केल्याचे सक्षम प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षा राखण्यात हे अधिकारी अपयशी ठरले आहेत. सेवाकार्यात गंभीर कुचराई केल्याविरोधात सक्षम प्राधिकरणाने खालील अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरु केली आहे.
- अतिरिक्त मुख्य सचिव-वाहतूक विभाग, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली, -त्वरित निलंबन.
- अतिरिक्त मुख्य सचिव-गृह आणि बांधकाम विभाग,राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली- कारणे दाखवा नोटीस.
- प्रधान सचिव वित्त - राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली आणि विभागीय आयुक्त -राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली -त्वरित निलंबन.
- उपविभागीय दंडाधिकारी, सीलमपूर,-कारणे दाखवा नोटीस
U.Ujgare/V.Joshi/P.Malandkar
(Release ID: 1609293)
Visitor Counter : 141