आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज: कोविड -19 विरुद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना

Posted On: 29 MAR 2020 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मार्च 2020
 

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत करण्यात आलेल्या घोषणेनुसार, ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजः कोविड -19 विरुद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना' सुरु करायला पुढील अटींसह मान्यता देण्यात आली आहे:--

  1. या अंतर्गत 22.12 लाख सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्याना नव्वद (90) दिवसांसाठी 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. यामध्ये कोविड- 19  रूग्णांच्या थेट संपर्कात राहणाऱ्या आणि त्यांची सेवा करणाऱ्या आणि या रोगाची लागण होण्याचा संभाव्य धोका असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामध्ये  कोविड- 19 ची लागण झाल्यामुळे झालेल्या अपघाती मृत्यूचा देखील समावेश असेल
  2. अभूतपूर्व परिस्थितीमुळे, खासगी रूग्णालयातील कर्मचारी / सेवानिवृत्त / स्वयंसेवक / स्थानिक शहरी संस्था / कंत्राटी  / दैनंदिन वेतन / तात्कालिक तसेच राज्ये  / केंद्रीय रुग्णालये / केंद्र / राज्ये / केंद्रशासित प्रदेशांची स्वायत्त रुग्णालये, एम्स आणि आयएनआय /केंद्रीय मंत्रालयांची रुग्णालये यांनी आउटसोर्स केलेल्या कर्मचाऱ्यांना कोविड-19 संबंधित जबाबदारी पार पाडण्याचे काम देता येईल. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने निर्देशित केलेल्या संख्येच्या अधीनही या प्रकरणांचा समावेश केला जाईल;
  3. या योजनेंतर्गत प्रदान करण्यात येत असलेले विमा संरक्षण लाभार्थींकडून घेतल्या गेलेल्या अन्य कोणत्याही विमा संरक्षणाव्यतिरिक्त असेल.


 

 

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane(Release ID: 1609099) Visitor Counter : 156


Read this release in: English