शिक्षण मंत्रालय
नॅशनल बुक ट्रस्ट प्रकाशित करणार कोरोना अभ्यास मालिका पुस्तके
कोरोनाच्या प्रभावानंतर सर्व वयोगटातील वाचकांसाठी उपलब्ध असतील ही पुस्तके
Posted On:
29 MAR 2020 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मार्च 2020
मानव संशोधन आणि विकास मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत पुस्तक प्रकाशन आणि पुस्तक संवर्धनासाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ने कोरोना आणि कोविड१९ या विषयावर अभ्यास मालिका प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
भविष्यकाळात मानवी समाजासाठी कोरोना (साथीचा रोग) आजारा विषयीच्या जागरूकतेचे विलक्षण मनोवैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन कोरोनाचा प्रभाव ओसारल्यानंतर वाचकांच्या गरजेसाठी सर्व वयोगटांकरिता ही अभ्यास मालिका तयार करण्यात येत आहे.
आम्ही कोरोनाशी संबंधित घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत आणि कोरोना साथीच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी मानव संशोधन आणि विकास मंत्रालयाच्या बहु-आयामी पुढाकारांचा आढावा घेत आहोत, असे नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाचे अध्यक्ष प्रा. गोविंद प्रसाद शर्मा म्हणाले.
आम्ही आमच्या काही निवडक आणि ‘बेस्टसेलिंग’ पुस्तकांची विनामूल्य पीडीएफ डाउनलोड्ससाठी उपलब्ध करून #StayHomeIndiaWithBooks हा उपक्रम सुरू केला आहे; त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पहिली पायरी म्हणून आम्ही ‘सायको-सोशल इम्पॅक्ट ऑफ कोरोना पॅन्डमिक अँड वेज टू कोप’ या उप-विषयावर पुस्तके तयार करण्यासाठी काही अनुभवी आणि तरूण मानसशास्त्रज्ञ / सल्लागारांचा समावेश असलेला एक अभ्यास गट तयार केला आहे. आम्ही लवकरच या पुस्तकांच्या दोन्ही ई-आवृत्त्या आणि छापील आवृत्त्या वाचकांना आधार म्हणून लवकरच उपलब्ध करुन देऊ, अशी आशा आहे, असे नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाचे संचालक युवराज मलिक यांनी सांगितले.
“आम्ही ‘कोरोना स्टडीज सिरीज’ अंतर्गत योग्य वाचन साहित्य तयार करण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती घेतली आहे. कोरोनाच्या विविध पैलूंविषयी जाणून घेण्यासाठी मुलांची पुस्तके तयार करीत आहोत. जागरूकता, कला, साहित्य, लोकसाहित्य, आर्थिक आणि समाजशास्त्रीय बाबी, कोरोना साथीच्या रोगातून उद्भवणारी विज्ञान / आरोग्य जागरूकता आणि विलगीकरण अर्थात लॉकडाऊन या विषयांवर आधारित पुस्तकेदेखील नियोजित आहेत, असे नॅशनल बुक ट्रस्टचे वरिष्ठ संपादक व या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे कुमार विक्रम यांनी सांगितले.
G.Chippalkatti/S.Pophale/D.Rane
(Release ID: 1609077)
Visitor Counter : 243