गृह मंत्रालय

कोविड -19 महामारीचा सामना करण्यासंबंधी तयारीबाबत अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी आढावा बैठक संपन्न


पंतप्रधानांच्या सूचनांनुसार दैनंदिन जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध करुन देण्याच्या व्यवस्थेचा गृहमंत्र्यांनी घेतला आढावा

प्रत्येक नागरिकाचे संरक्षण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मोदी सरकार पूर्णपणे वचनबद्ध: अमित शहा

प्रविष्टि तिथि: 28 MAR 2020 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 मार्च 2020

 

कोविड -19 महामारीचा सामना करण्यासंबंधी तयारीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आढावा बैठक घेण्यात आली. या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन सुरू झाल्यापासून ही तिसरी आढावा बैठक आहे.

या बैठकीत शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध करून देण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात सरकार कोणतीही कसर ठेवणार नाही. प्रत्येक नागरिकाचे संरक्षण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

3rd COVID REVIEW 2.JPG 3rd COVID REVIEW 1.JPG

या बैठकीला गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि जी. किशन रेड्डी यांच्यासह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत 'सोशल डिस्टॅन्सिंग'च्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले.

कोविड-19 बाबत गृह मंत्रालयाने आतापर्यंत घेतलेले निर्णय

https://mha.gov.in/sites/default/files/PR_ConsolidatedGuidelinesofMHA_28032020.pdf  येथे पाहता येतील.

 

 

U.Ujgare/S.Kane/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1608973) आगंतुक पटल : 253
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English