रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वे देणार 21 मार्च ते 14 एप्रिल पर्यंतच्या प्रवास कालावधीतील सर्व तिकिटांचा संपूर्ण परतावा


कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिल 2020 पर्यंत रेल्वेगाड्या आणि तिकीट आरक्षण सुविधा रद्द केल्यामुळे घेतला हा निर्णय

Posted On: 28 MAR 2020 5:01PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 मार्च 2020

 

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिल 2020 पर्यंत रेल्वेगाड्या आणि तिकीट आरक्षण सुविधा रद्द केल्यामुळे  21 मार्च ते 14 एप्रिल पर्यंतच्या प्रवास कालावधीतील सर्व प्रवाशांनी काढलेल्या सर्व तिकिटांचा संपूर्ण परतावा देण्याचा निर्णय भारतीय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या सूचना 21 -03 -2020 रोजी जारी केलेल्या  परतावा नियमातील सवलतींच्यानुसार आणि त्या व्यतिरिक्त आहेत. परतावा देण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

 

1. प्रवासी आरक्षण प्रणाली काउंटर तिकीट:

a) 27 मार्च 2020 पूर्वी तिकिटे रद्द केल्यास प्रवाशाने उर्वरित परतावा रकमेसाठी फॉर्म भरून त्यासोबत प्रवासाचा तपशील आणि तिकीट पावती 21 जून 2020 पर्यंत कोणत्याही विभागीय रेल्वे मुख्यालयातील मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक किंवा मुख्य दावे अधिकारी यांच्याकडे सादर करावा. प्रवाशांना यावेळी एक पावती दिली जाईल ज्याद्वारे प्रवाशी अशी तिकिटे रद्द केल्यानंतर कापण्यात आलेल्या शुल्काची भरपाई मिळवण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

b) 27 मार्च 2020 नंतर तिकिटे रद्द केल्यास- अशाप्रकारे रद्द केलेल्या सर्व तिकिटांवरही संपूर्ण परतावा मिळेल.

 

2) ई तिकीट:

a) 27 मार्च 2020 पूर्वी तिकिटे रद्द केल्यास- उर्वरित परतावा रक्कम प्रवाशाच्या, त्याने ज्या खात्यातून तिकीट आरक्षित केले होते त्या खात्यात जमा केली जाईल. शिल्लक परतावा प्रदान करण्यासाठी आयआरसीटीसी एक व्यावहारिक यंत्रणा तयार करेल.

b) 27 मार्च 2020 नंतर तिकिटे रद्द केल्यास- अशाप्रकारे रद्द केलेल्या सर्व तिकिटांवरही आधी केलेल्या तरतुदीनुसार संपूर्ण परतावा मिळेल.

 

U.Ujgare/V.Joshi/P.Kor


(Release ID: 1608853) Visitor Counter : 185


Read this release in: English