वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कोविड-19 या जागतिक साथीच्या आजाराशी मुकाबला करतांनाचे सरकारी ई-मार्केटप्लेसचे पुढाकाराचे प्रयत्न
सरकारी विभागांमार्फत वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुरळीत सुरु ठेवणार
Posted On:
28 MAR 2020 1:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2020
केंद्रीय माहिती आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील सरकारी ई-मार्केटप्लेस GeM या विशिष्ट हेतू पोर्टलने, कोविड-19 या जागतिक साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे.जीइएम हे सरकारी कार्यालयांना वस्तू आणि सेवा पुरवठ्यासाठीचे गतिमान, स्वयंपूर्ण आणि वापरण्यास सुलभ असे पोर्टल असून, सध्याच्या परिस्थितीत, या पोर्टलवरुन सरकारला जलद, प्रभावी, पारदर्शक आणि माफक दरात वस्तू आणि सेवांचा पुरवठा व्हावा, यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. सामान्य वित्तीय नियमांच्या आधारे या पोर्टलवरुन वस्तूंची खरेदी करता येते. सध्या 150 विभागात 7,400 उत्पादने या पोर्टलवर उपलब्ध आहेत. तसेच, वाहतुकीची साधने ही इथे भाड्याने उपलब्ध आहेत. जेईएम हे पूर्णतः कागदरहित, रोकडरहित, ऑनलाईन व्यवस्थेवर चालणारे पोर्टल असून सर्वसामान्यांना लागणाऱ्या वस्तू इथे मानवी हस्तक्षेपाविना मिळू शकतात.
या पोर्टलने कोविड-19 च्या प्रसारकाळात केलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे:
1. जेईएम वर कोविड-19 शी संबंधित एक समर्पित पेज तयार करण्यात आले आहे-: https://gem.gov.in/covid19
2. सध्या या पोर्टलवर अस्तित्वात असलेल्या 32 वैद्यकीय साधने आणि उपकरणांच्या यादीत आणखी काही वस्तूंची भर घालून त्याही उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या वस्तू खालीलप्रमाणे आहेत:
a. नवीन कोरोना विषाणू(COVID-19) नमुना संकलन कीट
b. पुन्हा वापरता येण्यासारखे विनैल/रबरी मोजे
c. डोळे संरक्षण साधने (वायझर/गॉगल्स)
d. नष्ट करता येणारे थर्मामीटर्स
e. एकदाच वापरात येणारे टोवेल्स
f. निर्जंतुकीकरणासाठी यु व्ही ट्यूबलाईट्स.
g. सर्जिकल आयसोलेशन फेस शिल्ड
h. वैद्यकीय कचरा नष्ट करणारी उपकरणे (incinerator)
3. सध्या अस्तित्वात असलेल्या 52 प्रकारच्या वस्तू आणि 7 सेवांच्या शिवाय, आणखी काही श्रेणी तयार करण्यात आल्या असून त्यावरून दुय्यम महत्वाच्या वस्तूंचा पुरवठा करता येणार आहे. त्या वस्तू--
a. सामान्य उपयुक्तताटूल कीट
b. अल्युमिनियम ची भांडी
4. यासोबतच, नीती आयोगाने शिफारस केलेल्या सर्व वस्तू देखील या पोर्टलवर उपलब्ध आहेत.
5. सध्या जेईएम या पोर्टलवर कोविड-19 शी संबंधित उपलब्ध असलेल्या सर्व श्रेणींमधील वस्तूंची यादी.:
एकूण 173
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित 120
दुय्यम/सहायक 53
वैद्यकीय उपकरणे आणि सहायक वस्तूंची संपूर्ण यादी परिशिष्टात जोडली आहे.
कोविड-19 शी संबंधित सर्व वस्तूंचा पुरवठा सुलभ व्हावा, यासाठी देखील या पोर्टलवर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
7. जागतिक बँकेने या काळात जेइएम वरुन कोविड-19 शी संबंधित वस्तूंची खरेदीक्षमता वाढवण्यास परवानगी दिली असून, त्यानुसार, ही क्षमता एक लाख डॉलर वरून 10 लाख डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे.
8. विक्रेत्यांचा पोर्टलवर समावेश :
कोविड-19 शी संबंधित वस्तूंच्या विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून या पोर्टलवर वस्तू मिळण्याची सोय करण्यात आली आहे. यात वैद्यकीय उपकरणे, औषधे, साधने यांचाही समावेश आहे. अशा 200 विक्रेत्यांचा पोर्टलवर समावेश करण्यात आला आहे.
परिशिष्ट - 1
वैद्यकीय वस्तूंची यादी
S. No. Item
1 Ventilators
2 Alcohol based hand-rub
3 Face shield (eye, nose & mouth protection)
4 N95 Masks
5 Latex single use gloves (clinical)
6 Reusable vinyl / rubber gloves (cleaning)
7 Eye protection (visor / goggles)
8 Protective Gowns / Aprons
9 Disposable thermometers
10 UV tube light for sterilization
11 Medical masks (surgical / procedure)
12 Detergent / Disinfectant
13 Detergent / Disinfectant
14 Detergent / Disinfectant
15 Single use towels
16 Biohazard bags
17 Wheel Chair
18 Glucometer with strips
19 Hard-frozen Gel Packs
20 Sample Collection Kit
21 Thermocool box / Ice-box
22 Stretcher
23 Stretcher
24 Thermal scanners
25 Batteries for thermal scanners
26 BP apparatus
27 IV Sets
28 IV Cannula
29 IV Stand
30 Ambulance
31 First aid
32 Medical Waste Incinerator
33 ICU Beds
34 Cardiac monitors
35 Syringe pumps
36 Syringe pumps
37 Portable x ray machines
38 Endotracheal tube
39 Suction tube
40 Suction tube
41 Oxygen cylinders
Annexure - 2
इतर सहायक/दुय्यम वस्तूंची यादी :
S. No. Item
1 Soap
2 Rubb Hall Tents
3 Chairs/Benches
4 Tables/Desks
5 Printer
6 Computer
7 Extension Boards
8 Matches
9 Candles
10 ID for Patients
11 ID for volunteers
12 Flyer - information booklet
13 White board + markers
14 Garbage bags, bins
15 Drinking Water+ Dispenser (4)
16 Cleaning items (Brooms)
17 Cleaning items (Mop)
18 Fire extinguisher
19 E Toilet
20 Genset / Back up
21 Whistle
22 Tool set – basic
23 Registration details - sticker/printer
24 Mattresses
25 Foldable Cots / Beds
26 Bed sheets
27 Pillows
28 Pillow Covers
29 Towels
30 Rubber Sheets
31 Blankets
32 Emergency Lamp
33 Laundry (Detergents)
34 Refrigerator – smallest
35 Tokens with number
36 Mosquito Repellent
37 Sanitary Pads
38 Diapers – kids
39 Steel Plates
40 Steel Glasses
41 Spoons
42 Jugs
43 Stove – Big
44 Large vessels
45 Buckets
46 Mugs
47 Tissue paper
48 Smaller bins
49 Paper
50 Pen
51 Stapler
52 Stapler Pins
53 Box file
54 Letterhead
G.chippalkatti/R.aghor/P.Kor
(Release ID: 1608786)
Visitor Counter : 236